Corona blast in Karnataka 149 new patients
Corona blast in Karnataka 149 new patients 
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकात "कोरोना'चा स्फोट ; नवे 149 रुग्ण 

सकाळवृत्तसेवा


बंगळूर: साखर प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंड्यामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या स्थलांतरितांची डोकेदुखी झाली आहे. मंड्या जिल्ह्यात मंगळवारी 24 तासात कोविड-19 ची 71 प्रकरणे आढळून आली. यामुळे राज्यात रुग्णांची संख्या 149 ने वाढली आहे. यासह राज्यातील संक्रमित लोकांची एकूण संख्या 1 हजार 395 इतकी झाली आहे. दरम्यान, कोरोनाव्हायरसमुळे राज्यात आणखी तिघांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 40 वर गेली आहे. 

मंड्यामध्ये आज एकाच दिवसात 71 लोकांना संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले. दावणगेरी 19, शिमोगा 12, गुलबर्गा 13, बंगळूर 12, बागलकोट, चिक्कमंगळूर प्रत्येकी 5, उडुपी, कारवार प्रत्येकी 4, हासन 3, गदग, यादगिरी, बिदर, विजयपूर आणि चित्रदूर्ग प्रत्येकी 1 अशी एकूण 149 नवीन प्रकरणे आढळली आहेत. 

दरम्यान, राज्यात तीन लोक संसर्गाचे बळी ठरले आहेत. बळ्ळारी येथील एका 61 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिला तापाच्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतीच त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रियाही झाली होती. विजयापूर येथील 65 वर्षीय व्यक्ती संसर्गाची बळी ठरली आहे. सोमवारी त्यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या 54 वर्षीय व्यक्तीचा मुलाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा 40 आहे. 

गुलबर्ग्यामध्ये महाराष्ट्रातील प्रवाशांची 11 प्रकरणे नोंदली गेली. शिमोगा जिल्ह्यातील 12 प्रकरणांपैकी 10 प्रकरणांचा महाराष्ट्र, केरळ प्रवासाचा इतिहास आहे. मुंबईच्या प्रवासाच्या इतिहासाची हसनमध्ये तीन प्रकरणे नोंदविली गेली असून कारवारमध्ये गुजरात आणि महाराष्ट्रातील सोलापूर प्रवासाच्या दोन घटना घडल्या आहेत. बेंगळूर शहरमध्ये चार रुग्णांची नोंद झाली असून त्यांचा पूर्वीच्या रूग्णांशी संपर्क आला होता. 

1 हजार 395 पैकी 530 रुग्णांना बरे वाटले असून 802 हून अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एकूण 40 लोकांचा या संसर्गाने मृत्यू झाला. राज्यात आढळलेल्या 149 घटनांपैकी 91 प्रकरणांचा महाराष्ट्रातील मुंबईशी संपर्क आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT