download (1).jpg
download (1).jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ब्राह्मणपुरीत दुसऱ्या  दिवशीही कोरोनाचा शिरकाव 

सकाळवृत्तसेवा

मिरज (सांगली) : शहरातील ब्राह्मणपुरीमध्ये दिंडी वेस परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. त्यामुळे पुन्हा एकदा ब्राह्मणपुरीमध्ये बऱ्यापैकी घबराट पसरली. येथील एका अपार्टमेंटमध्ये हा रुग्ण राहत असल्याने संपूर्ण अपार्टमेंटमध्ये कंटेनमेंट लागू करण्यात आला आहे. 

शिवाजी रस्त्यावरील प्रसिद्ध डॉक्‍टरांकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये ब्राह्मणपुरीतील या कोरोनाग्रस्ताचा समावेश होता. त्याच्यावर संबंधित डॉक्‍टरच्या रुग्णालयात आणि त्यानंतर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याच्या तपासणीचा अहवाल आज दुपारी प्रशासनास प्राप्त झाला. त्यानंतर लगेचच या रुग्णास मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्या समवेत राहणाऱ्या पत्नी, दोन मुली आणि नातवंडनाही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. ब्राह्मणपुरीमध्ये शुक्रवारी (ता.3) रानडे बोळ परिसरात पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर आज (शनिवारी) सलग दुसऱ्या दिवशी येथून जवळच असलेल्या दिंडी वेस परिसरात एका अपार्टमेंटमध्ये हा दुसरा रुग्ण मिळाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. हया दोन्ही अपार्टमेंटमध्ये सध्या कंटेनमेंट लागू करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT