पश्चिम महाराष्ट्र

Record Break : सांगलीत आढळले 921 नवे कोरोनाबाधित

स्नेहल कदम

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आता रोज दिड-दोनशेंनी वाढ होत आहे. काल नवे 764 रुग्ण आढळले होते. आज 921 नवे रुग्ण निष्पन्न झाले. 10 एप्रिलला 411 नवे रुग्ण आढळले होते. अवघ्या पाच दिवसात ही वाढ दुपटीने अधिक आहे. मृत्यूसंख्येतही पाच दिवसात चारपटीहून अधिक वाढ झाली आहे. पाच दिवसापुर्वी चौघांचा मृत्यू झाला होता. आज 17 जणांचा मृत्यू झाला.

गेल्या 1 मार्चला जिल्ह्यात 22 नवे रुग्ण सापडले झाले होते. त्यानंतर दिवसेंदिवस ही वाढ कायम आहे. दरम्यान, महापलिका क्षेत्रात 193 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यापैकी सांगलीत130, मिरजेत 63 आहेत. जिल्ह्यात पुन्हा एकदा साथीच्या उद्रेकाकडे जलदगतीने जात आहे. आरटीपीसीआर 2 हजार 393 चाचण्यांमधून 578 रुग्ण निष्पन्न झाले. एक हजार 706 अँटिजेन चाचण्यांमधून 365 नवे रुग्ण निष्पन्न झाले. प्रति चाचण्यामागे बाधितांचे प्रमाणही आता वाढताना दिसते. आजघडीला 737 रुग्णांची प्रकृती नाजूक आहे.

जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा आकडा एक हजार 889 इतका झाला. पाच दिवसांत चार पटीहून अधिक मृत्यूसंख्या वाढली आहे. जिल्ह्यात 1 मार्चला फक्त 166 उपचारांखालील रुग्ण होते. आजघडीला ही संख्या 5 हजार 528 इतकी झाली आहे. अवघ्या दिड महिन्यात ही वाढ 31 पटींनी अधिक आहे. पाच दिवसात या संख्येत दहापटीने अधिक वाढ झाली आहे.

तालुकानिहाय मृतांची संख्या अशी :

कडेगाव-1, खानापूर-3, पलूस-2, जत-1, कवठे महांकाळ-1, मिरज-1 वाळवा-5, मनपा-1,

उपचारांखालील रुग्ण - 5,528

गृहअलगीकरणातील रुग्ण- -4087

आज अखेरचे बरे- 51,003

एकूण बाधित- 58,420

शहरी भागातील बाधित- 8873

ग्रामीण भागातील बाधित- 30126

महापालिका क्षेत्रातील रुग्ण- 19421

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT