Corporator Samad Khan's push to police
Corporator Samad Khan's push to police 
पश्चिम महाराष्ट्र

नगरसेवक समद खानची पोलिसांना धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा

नगर : उत्सव काळात शहरबंदी केलेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक समद खान मुकुंदनगर परिसरात राजरोस फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो धक्काबुक्की करून पसार झाला. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


गणेशोत्सव आणि मोहरमच्या काळात शहरातील उपद्रवी लोकांना पोलिस व प्रांताधिकाऱ्यांनी शहरबंदी केली होती. त्यात नगरसेवक समद खानचा समावेश आहे. भिंगार कॅम्पचे पोलिस मुकुंदनगर परिसरात उपद्रवी लोकांच्या घरी जाऊन चौकशी करीत असताना समद खान राजरोस फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो धक्काबुक्की करून वाहनातून पसार झाला.
याबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल अजय नगरे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT