पश्चिम महाराष्ट्र

महावितरणच्या वायरमनचा तासगावात खून; दारूतून पाजले विषारी रसायन

सकाळ डिजिटल टीम

तासगाव : तासगाव-सांगली रस्त्यावर (tasgaon-sangli) कवठेएकंदपासून ३ कि.मी. अंतरावर शेतातील इमारतीमध्ये अभिजित सुधाकर नऊपुते (रा. औरंगाबाद) याचा खून झाल्याचे (crimecase) संशयित तासगाव पोलिसांत हजर झाल्यावर स्पष्ट झाले. दारूमध्ये विषारी रसायन मिसळून दारू पाजून ९ रोजी खून केल्याची कबुली संशयिताने दिली. संशयित प्रशांत अशोक पाटील (वय ३७, रा. कुमठे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद (aurangabad) येथील अभिजित सुधाकर नऊपुटे हा कुमठे (ता. तासगाव) येथे वायरमन म्हणून महावितरणमध्ये नोकरीस होता. ३ वर्षांपूर्वी त्याची येथून बदली औरंगाबाद येथे झाली आहे. तो कुमठे येथे नोकरी करत असताना संशयित प्रशांत पाटील आणि त्याची ओळख झाली. प्रशांतची पानपट्टी होती. त्यातून मृत अभिजित याच्या पत्नीशी त्याचे संबध जुळले. अभिजितची बदली झाल्यानंतरही प्रशांत याचे त्याच्या घरी येणे-जाणे सुरूच होते. ७-८ महिन्यांपूर्वी अभिजितच्या पत्नीला पळवून आणून प्रशांत सध्या मिरज येथे राहात होता.

दरम्यान, मृत अभिजित मला यातून मोकळे करा म्हणून मागे लागला होता. ९ रोजी संशयित प्रशांतने अभिजितला- सगळे मिटवून सोक्षमोक्ष लावू या, म्हणून बोलवून घेतले. दोघे तासगाव-सांगली रस्त्यावरील जुन्या हनुमान पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या शेतात दारू पित बसले. तेथे दारूत सायनाईडसारखे रसायन मिसळून संशयित प्रशांत याने ती दारू अभिजितला पाजली. प्रशांतचा मृतदेह तेथेच असलेल्या इमारतीच्या बाथरूममध्ये टाकून त्यावर माती टाकली आणि फरार झाला.

मात्र, हा प्रकार कधीतरी उघडकीस येणारच या भीतीने प्रशांत आज तासगाव पोलिसांत हजर झाला. हा प्रकार समजताच पोलिस निरीक्षक संजीव झाड़े, सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात जाबजबाब, फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT