Criminals arrested ; Murder attacks, robberies uncovered; Two accomplices were also arrested
Criminals arrested ; Murder attacks, robberies uncovered; Two accomplices were also arrested 
पश्चिम महाराष्ट्र

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद; खुनी हल्ला, जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस; दोघा साथीदारांनाही अटक 

सकाळवृत्तसेवा


सांगली ः पोलिस रेकॉर्डवरील पसार असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले. अजय बापु कांबळे (वय 23, रा. राजीव गांधीनगर झोपडपट्टी, जुना बुधाव रस्ता, सांगली) असे त्याचे नाव आहे. खुनी हल्ला, जबरी चोरी, घरफोडीसह 9 गंभीर गुन्हे उडकीस आले आहे.

सांगली-मिरज रस्त्यावरील भारती हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कारवाईनंतर एलसीबीच्या पथकाने आणखी दोघा साथीदारांना अटक केली. बापु उर्फ विश्‍वनाथ दिलीप काळे (वय 30), गेंडा उर्फ आकाश संतोष जाधव (रा. वाल्मिकी आवास) अशी त्या दोघांची नावे आहेत. 

अधिक माहिती अशी, की घरफोडी, जबरी चोरीसह तब्बल 14 गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश पंडीत पुजारी (वय 23, वाल्मिकी आवास घरकुल) याच्यावर तीन महिन्यापूर्वी पाचजणांनी तलवारीसह धारदार शस्त्राने खुनी हल्ला केला. चोरीच्या सोन्याची वाटणी आणि पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला. तेव्हापासून संशियत अजय बापू कांबळे पसार होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके तयार केली होती. अजय कांबळे हा भारती हॉस्टिलजवळ थांबला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रवीराज फडणीस, पोलिस प्रवीण यादव, सुरज पाटील यांना मिळाली. त्यानुसार तातडीने सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. 

अजय कांबळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदारांसह राकेश पुजारी याच्यावर खुनी हल्ला केल्याची कबुली दिली. सखोल चौकशी केली असता त्याने साथीदारांसह ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोड्या केल्याचे समोर आले. तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीसह तीन गुन्हे, मिरज ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील चोरी, कुपवाड औद्योगिक पोलिस ठाणे हद्दीतील चोरी, शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतील चोरी, शिरोली औद्योगिक पोलिस ठाण्यातील चोरी असे 9 गंभीर गुन्हे उघडकीस आले. दरम्यान, एलसीबीच्या अजय कांबळे याच्या दोन साथीदारांना वाल्मिकी आवास परिसरातून अटक केली. 

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडम, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक फडणीस, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, निलेश कदम, संजय कांबळे, इम्रान मुल्ला, प्रवीण यादव, सुरज पाटील, शशिकांत जाधव, कोमल धुमाळ, हेमंत ओणासे, विकास भोसले, संदीप गुरव, अनिल कोळेकर, संतोष गळवे, संदीप नलवडे, सुधीर गोरे, सोहेल कार्तियानी, आर्यन देशिंगकर यांचा सहभाग होता. 


रेकॉर्डवरील गुन्हेगार 
अजय कांबळे याचे साथीदार विश्‍वनाथ काळे आणि आकाश जाधव हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी त्यांच्यावर शहर, ग्रामीण, संजयनगर, विश्रामबाग, मिरज, कुपवाड व इतर जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी, जबरी चोरी, घरफोडी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT