The crops are gone; But dry wells trump
The crops are gone; But dry wells trump 
पश्चिम महाराष्ट्र

पिके गेली; पण कोरड्या विहिरी तुडुंब

संजय काटे

श्रीगोंदे : राज्यात सर्वाधिक बागायती तालुका म्हणून ओळख असलेल्या श्रीगोंद्यात यंदा पावसाने सरासरी गाठली. मात्र, हातातोंडाशी आलेले पीक आणि त्यात नको त्या वेळी कोसळलेल्या पावसामुळे शेतातील पीक घरापर्यंत आलेच नाही. हे दुःख पचवता न येणारे नसले, तरी अनेक वर्षे कोरड्या पडलेल्या विहिरी याच पावसाने तुडुंब भरल्या हे सुख पुढच्या पिकासाठी ठेवून पुन्हा एकदा शेतकरी शेतात राबू लागले आहेत. 

घोड, कुकडी व विसापूर प्रकल्पाचे पाटपाणी आणि भीमा आणि घोड नद्यांच्या पाण्याने श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस आणले. पाणी अडवा पाणी जिरवा ही एकेकाळची संकल्पना काही वर्षांत गरजेची वाटत होती. दुष्काळाने पाठ सोडलीच नाही आणि धरणे भरली असतानाही पाणी मिळालेच नाही अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची झाली होती. आता आहे त्या पाण्यावर पिके जगवून त्यातून मुलांचे भविष्य पाहणाऱ्या श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याला यावर्षी कोरड्या दुष्काळासोबतच ओला दुष्काळ आहे. 

सोबतीला कांदा, कापूस, द्राक्षे, डाळिंब या पिकांसह फळबागा आणि चारा पिके यांचे अवेळी पडलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके अशा पद्धतीने निसर्गानेच हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. श्रीगोंद्यात कांद्याचे आगर आहे. अनेक गावांतील शेतकरी शेतात राबून कष्टाचे चांगले पैसे कमावतो. पण कांद्याला पावसाने दगा दिला आहे. दुष्काळात कमी पाण्यावर कांद्याचे पीक घेण्यासाठी ठिबकचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना या वेळी जास्त पाऊस झाल्याने शेतातच कांदा व कांद्याची रोपे सोडण्याची नामुष्की आली.

डाळिंब व द्राक्षाचा मोठा खर्च करून वाढवलेल्या बागा डोळ्यांदेखत नेस्तनाबूत झाल्या. शेजारी पांढरे सोने अवकाळी पावसाने मातीमोल केले. मात्र, आता याच कापसाच्या पिकाशेजारची वर्षानुवर्षे कोरडी पडलेली 32 फूट खोलीची विहीर तुडुंब भरल्याचे सुख पेडगाव येथील शेतकऱ्यांनी अनुभवले. 

शेतकऱ्यांना पुढील पिकाची आशा 

याच पावसात तुडुंब भरल्याने किमान आता पुढची पिके तरी जोमाने येतील या अपेक्षेने शेतकरी पुन्हा एकदा शेतात राबत आहे. घोड, कुकडीचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने मिळाल्यास श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मातीत गाळलेल्या घामातून पैसा दिसेल, अशी अपेक्षा वाटत आहे.  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT