convention-in-kolhapur-ichalkaranji.gif
convention-in-kolhapur-ichalkaranji.gif 
पश्चिम महाराष्ट्र

मिशन मंगल, राधे राधे, मल्हारी मल्हारी ते टिक टिक! (video)

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : मिशन मंगलपासून राधे राधे, मल्हारी मल्हारी ते टिक टिकपर्यंत वेगवेगळ्या गीतावर अत्यंत नेत्रदीपक नृत्य येथील विशेष मुलांनी सादर केले. येथील सन्मती बौद्धिक अक्षम मुलांची शाळा, सन्मती व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आणि दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा या शाळेतील स्नेहसंमेलनात मुलांनी सादर केलेली नृत्ये उपस्थितांची दाद मिळवून गेली.
येथील जैन शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित वरील तीन शाळांमध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. विशेष मुलेही कलेमध्ये किती पारंगत होऊ शकतात, याचे दर्शन यानिमित्ताने झाले. कार्यक्रमाचे उद्‌घाटन रोटरी क्‍लब एक्झिक्युटिव्हचे अध्यक्ष गिरीष कुलकर्णी, उद्योजक जितेंद्र पारीख यांच्या हस्ते झाले. 

स्वागत संस्थेचे सचिव अमर डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष सुभाष काडाप्पा यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुकुमार पोते यांनी करून दिला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. ए. के. चौगुले, माजी अध्यक्ष डॉ. कुबेर मगदूम, डॉ. पी. जे. बडबडे, डॉ. एस. डी. बरगाले, शाळेच्या अध्यक्षा प्रा. निर्मला ऐतवडे, उपाध्यक्ष संजय खूळ, सी. डी. लडगे, मधुकर मणेरे उपस्थित होते. सूत्रसंचालन तीर्थंकर माणगावे यांनी केले.

<

>

सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. आई तुझं देऊळ, टिक टिक प्लास्टिक, ऑल इज वेल, ढगाला लागली कळं, आली कडक लक्ष्मी अशा अनेक गीतांवर नेत्रदीपक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. देशभक्तिपर अनेक नृत्ये या विद्यार्थ्यांनी सादर केली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जाजू यांनी केले. येथील उत्तम चित्रमंदिरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT