चोरट्यांनी तिजोरीतील विस्कटलेले साहित्य
चोरट्यांनी तिजोरीतील विस्कटलेले साहित्य sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणीत वकिलाच्या घरी धाडसी चोरी

राजेंद्र हजारे

निपाणी : येथील खोत गल्लीतील रहिवासी, प्रसिद्ध वकील अॅड. महेश बसवराज दिवाण यांच्या घरी गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करून तब्बल ९ तोळे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम ७१ हजार असा एकूण सुमारे ५ लाखांचा ऐवज लंपास केला. निपाणी शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शहराच्या मध्यवर्ती महादेव मंदिर भागातील खोत गल्लीत अनेक वर्षापासून अॅड. दिवाण आपल्या कल्पवृक्ष या तीन मजली बंगल्यात वास्तव्यास आहेत. गुरुवारी (ता.९) रात्री दिवाण हे नेहमीप्रमाणे तळमजल्याच्या पुढील दरवाजाला कुलूप लावून दुसऱ्या मजल्यावर कुटुंबीयांसमवेत झोपावयास गेले.

दरम्यान चोरट्यांनी नेमकी संधी साधून मध्यरात्रीच्या सुमारास दिवाण यांच्या तळमजल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी आतील तिजोरी फोडून देवघरातील गंठण, कर्णफुले दोन जोड असे एकूण ९ तोळ्याचा सोन्याचा ऐवज तर देवारयातील चांदीची मूर्ती व गळ्यातील ऐवज तसेच रोख रक्कम १८ हजार असा एकूण सुमारे ५ लाखाचा ऐवज व मुद्देमाल लंपास करून पोबारा केला. त्यानंतर तोडलेले कुलूप शेजारच्या बंगल्यातील एका फुलझाडाच्या कुंडीत टाकले आहेत. त्यापैकी एकाचा टॉवेल चोरीच्या ठिकाणीच टाकून ते पलायन केले आहेत.

नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता.१०) पहाटे सहाच्या सुमारास दिवाण यांची पत्नी तळमजल्याच्या दरवाजा समोर आली असता घराचे कुलूप उघडून दार उघडे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तात्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महेश दिवाण यांनी त्याची माहिती बसवेश्वर चौक पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी, हवालदार श्रीशैल मळ्ळी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी दिवाण यांनी चोरीस गेलेला ऐवज व रकमेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी बेळगाव येथून श्वानासह ठसे तज्ञांना पाचारण केले. दुपारी घटनास्थळी आलेले श्वान परिसरातच घुटमळले. यावेळी ठसेतज्ज्ञांनी आवश्यक ते ठसे घेतले. विशेष म्हणजे भरवस्तीत ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत अॅड. महेश दिवाण यांनी बसवेश्वर चौक पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी चालविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT