पश्चिम महाराष्ट्र

पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरीची आत्महत्या, तिसरीचा खून!

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : पत्नी सुनंदा हिचा खून केल्याप्रकरणात शिक्षक असलेला पती सुभाष निवृत्ती भोसले (वय 50, रा. संजयनगर, बाबाजी पाटील वाडी, मुंब्रा ठाणे. मूळ गाव- मसले चौधरी, ता. मोहोळ) यास जिल्हा न्यायाधीश एस. एम. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

भोसले हा ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 81 येथे वरिष्ठ शिक्षक म्हणून नोकरीला होता. पहिली पत्नी यशोदा यांचा 1997 मध्ये आजाराने मृत्यू झाला होता. दुसरी पत्नी राजश्री हिच्यासोबत 2005 मध्ये विवाह केला होता. तिने आत्महत्या केल्याने भोसलेविरुद्ध कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. आरोपी भोसले याने 2013 मध्ये सुनंदा हिच्याशी लग्न केले. 28 मे 2014 रोजी आरोपी भोसले याने तिसरी पत्नी सुनंदा हिचा खून केला. 

चोरट्याने प्रवासादरम्यान लूटमार केल्याची खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली होती. तपासात पती भोसले हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात सरकारतर्फे अॅड. आनंद गोरे, (स्व.) अॅड. इनायतअली शेख, आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.

खुनानंतर रंगवली होती कहाणी... 

सुभाष भोसले हा पत्नी सुनंदासह स्वत:च्या कारने मूळ गाव मसले चौधरी (ता. मोहोळ) येथे जाण्यासाठी टेंभुर्णीमार्गे निघाला होता. टेंभुर्णीपासून काही अंतरावर सापटणे गावाजवळ पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी कार अडविली. मारहाण करून चाकू लावून पैसे, सोने काढून घेतले. सुनंदा हिने कसले पैसे असे म्हणताच चोरट्याने मारहाण करून तिच्या अंगावरील सोने व दागिने काढून घेतले. दोघा पती-पत्नीला सोलापूर रस्त्यावर अंधारात ढकलून दिले. चोरट्याने सोन्याचे दागिने असा एकूण 60 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पत्नीला लोखंडी पाइपने डोक्‍यात मारून ठार केले. अशी बनावट हकीकत तयार करून सुभाष भोसले याने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी गुन्ह्याचा तपास केला. तपासात तोच सुनंदाच खुनी असल्याचे समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT