solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

सावधान.. मृत्यू तुमची वाट पाहतोय! 

परशुराम कोकणे

सोलापूर : मृत्यू... कधी आणि कुठे येईल, हे सांगता येत नाही. तो कोणत्याही रूपात येऊ शकतो. शहरातील पथदिव्यांच्या खांबांची झाकणे चोरीला गेल्याने वायरिंग उघड्या स्थितीत आहे. दुभाजकावरून रस्ता ओलांडताना किंवा सिग्नलला थांबल्यावर चुकून वायरिंगला हात लागल्यास विजेच्या धक्‍क्‍याने तुमची मृत्यूशी गाठ नक्की आहे. महापालिका विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात सगळीकडेच असुरक्षित पथदिव्यांद्वारे मृत्यू तुमची वाट पाहत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. 

आधारासाठी खांबांचा वापर 
अनेकदा वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुले रस्ता ओलांडताना पथदिव्यांच्या खांबांचा आधार घेताना दिसून येतात. वायरिंगला चुकून हात लागला तर विजेचा धक्का बसू शकतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडीवाले, टपरीचालक, भाजी विक्रेत्यांकडून पथदिव्यांच्या खांबांना दोरी किंवा तार बांधून सावलीसाठी कापड बांधले जात आहे. 

झाकणांची चोरी 
पन्नास-शंभर रुपयांसाठी भुरट्या चोरट्यांकडून पथदिव्यांच्या झाकणांची चोरी होत आहे. नवीन खांब बसविला की आठ दिवसांत झाकण चोरीला जात आहे. याची माहिती असूनही महापालिका विद्युत विभागाने आजवर कोणतीही दक्षता घेतली नाही. विद्युत विभाग आणि पोलिसांनी झाकणे चोरणाऱ्या भुरट्या चोरट्यांवर पाळत ठेवून कारवाई करायला हवी. 

तात्पुरती मलमपट्टी नको 
पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगला तात्पुरती मलमपट्टी न करता सुरक्षेसाठी कायमस्वरूपी झाकणे बसविणे किंवा अन्य उपाययोजना करायला हव्यात. धोकादायक पथदिव्यांची वेळोवेळी दुरुस्ती व्हायला हवी. सुरक्षेसाठी वायरिंगजवळ "सावधान.. वीजप्रवाह चालू आहे.' असा फलकही लावता येईल. आवश्‍यक तिथे नियमित दुरुस्ती करण्यात यावी. 

पथदिव्यांच्या खांबांना असलेली झाकणे अनेक ठिकाणी चोरी गेली आहेत. त्यामुळे दिव्यांची वायरिंग बाहेर आली आहे. कोणालाही विजेचा धक्का बसू नये यासाठी विद्युत विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. दुभाजकावरून रस्ता ओलांडताना कोणीही पथदिव्यांच्या खांबांचा आधार घेऊ नये. 
- आर. एम. परदेशी, अभियंता, विद्युत विभाग, महापालिका 

शहरात अनेक ठिकाणी रस्ते दुभाजकांमधील पथदिव्यांच्या खांबांची वायरिंग उघडी आहे. अशी असुरक्षितता नागरिकांच्या जिवावर बेतू शकते. महापालिकेने याकडे तत्काळ लक्ष द्यायला हवे. एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहू नये. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना सुरक्षेच्या दृष्टीने या छोट्या छोट्या बाबीही महत्त्वाच्या आहेत. 
- सिद्धाराम बिराजदार, सामाजिक कार्यकर्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT