Debt relief process should be happened in government way
Debt relief process should be happened in government way 
पश्चिम महाराष्ट्र

शासन निर्णय धाब्यावर बसवून कर्जवसुली पडेल महागात 

महेश पाटील

सलगर बुद्रूक, (सोलापूर) : शासन निर्णय धाब्यावर बसवून कर्जवसुली करणाऱ्या सलगर बुद्रूक मधील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या अधिकाऱ्याने जी कर्ज वसुली सुरू केली आहे, त्या अधिकाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट मत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी 'सकाळ'च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

आजपर्यंतचा सर्वात मोठा दुष्काळ सलगर परिसरास संपूर्ण राज्यात पडला आहे. जनावरांना खायला चारा व प्यायला पाणी नाही. शेतकरी संपूर्ण नागावला आहे. परवाच सलगर बुद्रूक येथील युवा शेतकऱ्याने दुष्काळी मानसिकतेला कंटाळून आत्महत्या केली. आणखी काही तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण पुढे उपचारासाठी नेल्यानंतर ते वाचले आहेत. आशा गंभीर परिस्थितीची जाणीव असताना व शासन आदेश असताना देखील शासन निर्णय धाब्यावर बसवून कर्ज वसुली करणाऱ्या मस्तवलेल्या अधिकाऱ्याकडून कर्जवसुली सुरूच आहे. दरम्यान या अधिकाऱ्यावर कारवाही व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून होत आहे.

आत्महत्या ग्रस्त सलगर बुद्रूक सारख्या गावामध्ये दुष्काळाशी सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांंच्या जीवाशी खेळणाऱ्या विदर्भ कोकण बॅंकेच्या अधिकाऱ्याने कर्जवसुलीची मोहीम थांबवली नाही तर बॅंकेवर प्रहार संघटनेमार्फत मोर्चा काढण्यात येईल. - संतोष पवार, जिल्हा युवा अध्यक्ष प्रहार संघटना सोलापूर                                  
विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज वसुली थांबवावी. नाहीतर 25 तारखेपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात याबद्दल मी आवाज उठवणार असून, शासन आदेश व जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून जर कर्जवसुली सुरू असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्त बसणार नाही. - आमदार भारत भालके 

मी सलगर बुद्रूक येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचा कर्जदार आहे. दुष्काळी परिस्थितीत मला कर्ज भरता आले नसल्याने बॅंकेने माझ्या विरोधात कारवाही करण्यासाठी माझा चेक बाऊन्स केला आहे. तरी मला न्याय मिळावा. - रामचंद्र जाधव, शेतकरी सलगर बुद्रूक 

शासन निर्णयाला डावलून आम्ही काहीही वसुली करत नाही. कर्ज स्थगितीचा शासन आदेश आहे, पण तो रब्बी पिकासाठी आहे. आरबीआयच्या नियमानुसार आमची वसुली सुरु आहे. - शिशिर देशमुख, मुख्य व्यवस्थापक, सोलापूर जिल्हा विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT