The deceased woman sat up in belgum marathi new 
पश्चिम महाराष्ट्र

अंत्यसंस्काराची तयारी झाली अन् मृत घोषित महिला उठून बसली...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - मृत समजून घरी आणलेली महिला अंत्यसंस्कारावेळीच घरात उठून बसल्याने धावपळ उडाल्याची घटना बुधवारी (ता. ८) मुचंडीत घडली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सदर महिलेला रुग्णालयाने मृत घोषित केले. पण, सदर महिलेला घरच्या मंडळीनीच अत्यवस्थ स्थितीत घरी नेल्याचे खासगी रुग्णालयाचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकारामुळे मुचंडी परिसरात सध्या चर्चेला ऊत आला आहे.

रुग्णालयाने मृत घोषित केल्याचा दावा

मुचंडीतील ५५ वर्षीय महिलेला आजारामुळे बेळगावातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी घरी नेण्यात आले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार डॉक्‍टरांनी मृत घोषित केल्याने तिच्या अंत्यविधीची तयारी केली जात होती. महिलेचे काही नातलग सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी गेले होते. त्यांनीही यात्रा सोडून घर गाठले. मात्र, नातेवाईक आल्यानंतर महिला उठून बसल्याने सर्वांनाच सुखद धक्‍का बसला. खासगी रुग्णालय प्रशासनानेही या प्रकरणातून आपले हात झटकले आहेत. संबंधित महिलेला रुग्णालयाने मृत घोषित केले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकारामुळे मुचंडीत मोठा गोंधळ उडाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

SCROLL FOR NEXT