Decrease In Population Of Butterfly Due To Insecticides  
पश्चिम महाराष्ट्र

गाव - शिवाराला पारखी झाली फुलपाखरं, पण कशामुळे ?

सकाळ वृत्तसेवा

सांगली - आपल्या शिवार आणि बागेतून आता फुलपाखरं हद्दपार झाली आहेत. गेल्या वीस ते पंचवीस वर्षात हे प्रमाण थोडे थोडके नव्हे तर साठ ते सत्तर टक्के इतके घटले आहे. त्याचे मोठे दुष्परिणाम अन्नसाखळीवर होत असल्याचे फुलपाखरांचे अभ्यासक प्रा.सुरेश गायकवाड यांनी सांगितले. 

देशातील फुलपाखरांच्या सुमारे पंधराशेवर जाती आहेत. त्यापैकी  सांगली परिसरात ८५ ते ९० जातींची फुलपाखरं आढळतात. अंडी, अळी, कोष आणि मग फुलपाखरू असे जीवनचक्र असते. फुलपाखरांना दोन प्रकारच्या वनस्पती लागतात. नेक्‍टर प्लांट - ज्यातून फुलपाखरांना मकरंद मिळतो. उदा. घाणेरी, एक्‍सझोरा, पेंटास, खुपिया, हेमेलिया आणि  होस्ट प्लांट - ज्यावर फुलपाखरांच्या अळ्या पान खाऊन जगतात, मात्र सगळी फुलपाखरे फुलांवर बसत नाहीत. काही फुलपाखरे चिखल, शेण, ओली माती, कुजलेली फळ, वनस्पतींनी पाझरलेला द्रव व मलमूत्र यांच्याकडेदेखील आकर्षित होतात. फुलपाखरू निसर्गचक्रातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. यावर कोळी , पाली , सरडे , पक्षी असे विविध घटक अवलंबून आहेत. 

अवघी दहा वीस टक्केच फुलपाखरं

प्रा. गायकवाड म्हणाले,‘‘पूर्वी दिवाळीत मोठ्या संख्येने फुलपाखरं दिसायची. दसऱ्याला घटस्थापनेसाठी माती आणायला गेल्यानंतर कोरट्याळच्या झाडावर थवे दिसायचे. मात्र किटकनाशक-तणनाशकांच्या वापरामुळे फुलपाखरांवर गंडातर आलं. आता अवघी दहा वीस टक्केच फुलपाखरं दिसतात. जंगलातच आता फुलपाखरांचं अस्तित्व उरलं आहे. अग्निशिखा वनस्पतीवर किमान पन्नासांवर प्रकारची फुलपाखरं दिसतात. ’’

कीटकनाशकांचा वापर फुलपाखरांच्या मुळावर

फुलपाखरांचे अभ्यासक सर्वदमन कुलकर्णी म्हणाले,‘‘ फुलपाखरू हे चांगल्या वातावरणाचे द्योतक आहे, कोणत्याही परिसंस्थेमध्ये झालेल्या चांगल्या व वाईट बदलाचे निदर्शक म्हणून फुलपाखरू उपयोगी पडतात. काँक्रिटीकरण आणि कीटकनाशकांचा वापर फुलपाखरांच्या मुळावर उठला आहे. त्यांचा अधिवास नष्ट होत आहे. रस्त्याकडेची झुडपे हटवल्यानेही  त्यांची अन्नसाखळी तुटली. फुलपाखरं पाहण्यासाठी पडीक रानमाळावरच जावे लागतेय. कोकणात सध्या मोठ्या संख्येने फुलपाखरं दिसत आहेत.’’ 

ब्लु मोरमॉन

जून २०१५ मध्ये ‘ब्लू मोरमॉन’ हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. या फुलपाखरासाठी मराठी नाव ‘नीळपंख’, नीळवंत तसेच राणी पाकोळी नावाने ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT