Demand for the electricity supply of British Water reservoir earlier
Demand for the electricity supply of British Water reservoir earlier 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रिटीशकालीन जलाशयाचा विद्युत पुरवठा पुर्वीप्रमाणे करण्याची मागणी

राजकुमार शहा

आष्टी ता. मोहोळ - येथील ब्रिटीशकालीन जलाशयाचा विद्युत पुरवठा पुर्वीप्रमाणेच आठ तास करावा, अशी मागणी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी शेतकरी शिष्टमंडळासमवेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

आष्टी जलाशयातील पाण्यावर सध्या ऊस फळबागा व इतर पिके मिळुन सुमारे पंधरा हजार एकर बागायत आहे. पाऊस नसल्याने विहीरी व बोअर यांची पाणी पातळी घटली आहे. हुमणी मुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वजनात मोठी घट येणार आहे. विद्युत पुरवठा कमी केला व ऊसाला पाणी देता आले नाही तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही. ऊसावर शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले असून ते फेडणे शक्य नाही. सध्या कारखाने सुरु असून येत्या फेब्रुवारी पर्यत सर्व ऊस गाळपास जाणार आहे.

तसेच उजनी च्या प्रत्येक रोटेशन वेळी तलावात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे तलावातील पाणी कमी होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे पुन्हा विद्युत पुरवठा आठ ऐवजी तीन तास केला तरी चालणार आहे. यावेळी सौदागर खडके, भिमाचे संचालक राजेंद्र टेकळे, बाळासो टेकळे, अंकुश चवरे, जयसिंग अवताडे, धनाजी टेकळे, पांडुरंग डोंगरे, देवा चवरे उपस्थित होते.
 
दरम्यान आष्टी तलाव परिसरातील पन्नास ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा वरिष्ठांच्या आदेशाने खंडीत केल्याची माहिती पेनुर येथील विद्युत उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता विवेक आकेन यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT