पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपुरात नगरसेवकाला डेंगी

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर - शहर परिसरासह तालुक्‍यात  डेंगीच्या साथीचा विळखा वाढत आहे. त्याची झळ सामान्यांनाच काय, पदाधिकाऱ्यांनाही बसत आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व इस्लामपूर पालिकेतील शिक्षण सभापती आनंदराव पवार हेदेखील डेंगीने आजारी आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात तीन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. डेंगीच्या प्रसारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सत्ताधारी गटातील प्रमुख व्यक्तीलाच डेंगी झाल्याने आता तरी प्रशासन ठोस उपाययोजना करेल काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

थांबून थांबून येणारा पाऊस, मधूनच तापमानातील वाढ आणि वातावरणात सतत होणार बदल यामुळे शहरासह तालुक्‍यात अनेक दिवसांपासून साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. यामध्ये डेंगीबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. ताप, थंडी, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे या रुग्णांत दिसत आहेत. शहरातील गांधी चौक, लाल चौक, ब्राह्मणपुरी या भागात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखाने साथीच्या रुग्णांनी हाऊसफुल आहेत. 

उपजिल्हा रुग्णालयात डेंगीची तपासणी होत नसल्याने रुग्णांना खासगी प्रयोगशाळांत रक्त तपासणी करावी लागत आहे. त्याचा जादा खर्च सोसावा लागत आहे. तपासणीनंतर डेंगी असल्याचे निदान झाल्यास आठ-दहा दिवस सलाईन व अन्य औषधोपचार घ्यावा लागतो.

पालिकेचे शिक्षण सभापती आनंदराव पवार हेदेखील तीन दिवसांपासून डेंगीने त्रस्त आहेत. त्यांच्यावरही येथील खासगी 
रुग्णालयत उपचार सुरू आहेत. साथीच्या रोगाबाबत उपाय योजना करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला. त्यात शहरातील प्रभागरचनेनुसार स्वच्छता करण्याचे ठरले होते.

गटार स्वच्छता व औषध फवारणी संदर्भात कृती आराखडा तयार करण्यात आला. परंतु हे सर्व केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात काहीच आलेले नाही. आरोग्य विभागातर्फे शहरातील डेंगीबाधित रुग्णांची संख्या १४२ दाखवली असली तरी प्रत्यक्षात  मात्र ही संख्या दोनशेहून अधिक आहे. या आकडेवारी वरून शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. 

पालिका प्रशासनाने डेंगीवरील उपाय योजनांबाबत केवळ कागदोपत्री नियोजन केल्याचे दिसते. कारण साथ आटोक्‍यात येण्याऐवजी बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती कार्यक्रम राबवावा, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT