पश्चिम महाराष्ट्र

ढोलेवाडी सोसायटी सभेच्या ठिकाणी राडा

सकाळवृत्तसेवा

ढालगाव : ढोलेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे जिल्हा बॅंकेच्या मतदानासाठी एकाची निवड करावयाच्या सेवा सोसायटीच्या सभेच्या ठिकाणी राडा होऊन सभा तहकूब करण्यात आली. तर दोन दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या सदस्याला माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गाडीत पाहून कार्यकर्त्यांनी गाडीची काच फोडण्याचा प्रकार घडला आहे. 

याविषयी घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सांगली जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. यासाठी सेवा सोसायट्यांनी मतदान करण्यासाठी एका सदस्याचे नाव एकमताने निवडायचे आहे. यासाठी ढोलेवाडी गावात नाव निवडण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. 

सेवा सोसायटीची सत्ता माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटाच्या शंकर चोरमुले यांच्याकडे आहे. सोसायटीत एकूण 13 सदस्य असून घोरपडे यांच्या गटाकडे 11 तर खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाकडे दोन सदस्य होते. मात्र पाच वर्षांत बरीच फाटाफूट होऊन खासदार गटाकडे 6 तर घोरपडे गटाकडे सहा असे बलाबल झाल्याने एक सदस्य आनंदा खरात यांना घोरपडे गटाच्या पोलिस पाटील कृष्णा चोरमुले यांनी पळवून नेले होते. त्याबाबत पोलिस पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

आज मंगळवारी दुपारी सोसायटीच्या कार्यालयात नाव निवडण्यासाठी सभा होती. खासदार गटाचे सहा सदस्य गैरहजर होते. तर घोरपडे गटाचे सहा सदस्य हजर होते. पळवून नेलेल्या सदस्याला अजितराव घोरपडे स्वतःच्या गाडीने घेऊन गावात येताच पळवून नेलेल्या आनंदा खरात यांच्या घरच्यांनी गाडीला घेराओ घालून काच खाली घेण्याची विनंती केली त्या झटापटीत घोरपडे यांच्या गाडीची काच फुटली. पळवून नेलेल्या खरात यांनी घरच्यांनी ताब्यात घेतले व खासदार गटाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितल्याने गावात चांगलाच तनाव निर्माण झाला होता. तर सभेसाठी खासदार गटाचे सहाही सदस्य उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे कोरमअभावी सोसायटीची सभा तहकूब करण्यात आली. 

दरम्यान विलास तातोबा चोरमुले यांनी पोलिसांत राजाराम संभाजी खरात, राजेंद्र तानाजी चोरमुले, बाबासाहेब रंगराव खरात व ब्रह्मानंद शिवाजी खरात यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून आदर्श सोसायटीच्या ठरावात आनंदा खरात यांनी भाग घेऊ नये म्हणून चार चाकी कार (एम एच 10: ए-3124) गाडी आडवून सदस्याला पळवून नेले व गाडीची पुढच्या बाजूची काच फोडली असल्याची तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT