In the digital payment, Solapur municipality has eighteen in the country
In the digital payment, Solapur municipality has eighteen in the country 
पश्चिम महाराष्ट्र

'डिजिटल पेमेंट'मध्ये सोलापूर महापालिका  देशात अठरावी  

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 18वे मानांकन मिळवले आहे. दुसऱ्या घोषणेत हा क्रमांक 21 होता. नव्या  मानांकनाची घोषणा काल रात्री झाली. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालय डिजिटल झाले पाहिजे, अशा सक्त सूचना पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत. त्यासाठी 1 ऑगस्ट ते 31 ऑक्‍टोबर हा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. त्यादृष्टीने महापालिकेने पहिले पाऊल टाकले आहे.

तसेच स्मार्ट सिटी कार्यालयातील व्यवहार 100 टक्के डिजिटल करण्यात आले आहेत. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही, याचा दर महिन्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठविला जात आहे. 

डिजिटल पेमेंटमध्ये सहभाग वाढविण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन ऑनलाइन पद्धतीने केले जाते. त्यासाठी संबंधित बँकेने सर्वांना एटीएम व डेबिट कार्ड उपलब्ध करून दिले आहेत. तसेच जवळपास सर्वच व्यापाऱ्यांकडून स्वाईप कार्ड स्वीकारण्यात येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने, धनादेश किंवा डीडीद्वारे न करता ऑनलाइन डिजिटल पद्धतीने करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जे अधिकारी व कर्मचारी आपले आर्थिक व्यवहार 1 ऑगस्ट ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट पद्धतीने करतील, त्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच बक्षीस देऊन गौरविण्यातही येणार आहे.

राज्यात चौथे मानांकन 

सोलापूर महापालिकेने राष्ट्रीय स्तरावर 18वे स्थान पटकाविले असले, तरी राज्यात चौथे स्थान मिळवले आहे. पिंपरी-चिंचवड प्रथम क्रमांकावर असून, पुणे द्वितीय, नाशिक तृतीय क्रमांकावर आहे. त्यानंतर सोलापूरचा क्रमांक लागला आहे. डिजिटल पेमेंटमध्ये सोलापूर महापालिका अग्रस्थानी नेण्याची चांगली संधी मिळणार आहे. बँकेत पैसे भरणे, काढणे, मिळकत कर, वीजबिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल, रिचार्ज, पेट्रोल तसेच दैनंदिन खरेदी ऑनलाइन करता येणार आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT