prithviraj foundetion.jpg
prithviraj foundetion.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनतर्फे  मास्क, सॅनिटायझरचे वाटप 

सकाळवृत्तसेवा

सांगली-महापूराच्या काळात सांगलीकरांच्या मदतीला धावून आलेल्या पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनने "कोरोना' च्या संकटातही मदतीचा हात दिला आहे. फाऊंडेशनच्यावतीने मास्क, सॅनिटायझर वाटप सुरू आहे. पहिल्या टप्प्यात एसटी चालक-वाहक, पोलिस कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर दिले. स्वच्छता कर्मचाऱ्यांना देखील सुरक्षा साधनाचे वाटप करून आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. 


कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापूराच्या काळात मदतीसाठी धाव घेतली होती. पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यापासून त्यांना मदतीचे कीट वाटप, औषधे वाटप करून आरोग्य शिबीरांचे आयोजन केले होते. तसेच पूरग्रस्तांना अनुदान वाटपात अन्याय होत असल्याचे पाहून त्यांनी आंदोलन करून संबंधितांना न्याय मिळवून दिला होता. पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्यावतीने श्री. पाटील यांचे समर्थक विविध सामाजिक उपक्रम राबवतात. पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेल्या व्यक्ती व संस्थांचा देखील सत्कार केला होता. 


"कोरोना' चे संकट आल्यानंतरही फाऊंडेशन मदतकार्य सुरू केले आहे. दहा दिवसापूर्वी बसस्थानकातील चालक-वाहक व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांना ठाण्यात जाऊन मास्क, सॅनिटायझर दिले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय उपाय करावेत याबाबत जनजागृती करण्यासाठी परिसरात माहिती पत्रकाचे वाटप केले आहे. गुलाबराव पाटील हॉस्पिटलमध्ये नियंत्रण कक्ष सुरू केला असून त्याचा संपर्क क्रमांक जाहीर केला आहे.

दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांना देखील मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. प्रभाग 16 आणि 13 मध्ये नुकतेच पृथ्वीराज पाटील, माजी महापौर हारूण शिकलगार, माजी नगरसेवक दिलीप पाटील, महाबळेश्‍वर चौगुले, बिपीन कदम, सच्चिदानंद कदम, पोपटराव पाटील, आबा फडतरे यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. मंदार काटकर, प्रकाश शितोळे, रवी खराडे, सनी धोत्रे, आयुब निशानदार, इरफान मुल्ला, आशिष चौधरी आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT