पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयात रुग्णांची परवड सुरूच 

प्रवीण जाधव

सातारा - गेल्या तीन वर्षांत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. उपलब्ध मुनष्यबळाच्या योग्य नियोजनाचा अभाव, औषधांचा तुटवडा, स्वच्छता, आधुनिक यंत्रणांचा अभाव अशा सर्वच पातळीवरील उदासिनतेमुळे रुग्णांची परवड सुरू आहे. नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांना रुग्णालयाला शिस्त लावण्याची कामगिरी पहिल्यांदा बजावावी लागेल. 

जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे रुग्णालय म्हणून जिल्हा रुग्णालयाला ओळखले जाते. सर्वसामान्य रुग्णांना या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचाराची सुविधा अपेक्षित असते. फिजिशियन नसल्याने अनेक रुग्णांना ससून हॉस्पिटलचा रस्ता दाखवला जातो. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरुत्साहामुळे रुग्णांना त्रास होत आहे. शस्त्रक्रियांसाठीही अनेक महिने रुग्णांना वाट पाहावी लागत आहे. 

बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची परवड होत आहे. शासकीय नियमानुसार सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी चार ते सहा अशा बाह्यरुग्ण विभागाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. मात्र, वेळेतही बहुतांश वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात. अनेक दांडी बहाद्दरांना वठणीवर आणावे लागणार आहे. 

स्वतंत्र अत्याधुनिक रेडिओलॉजी विभाग करण्याच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन कऱ्हाडला हलविण्यात आले. परंतु, तीन वर्षे झाले तरी अद्याप हा विभाग सुरू झालेला नाही. सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्‍स रे, विविध प्रकारच्या टेस्ट बाहेरून करायला लावण्याचा सपाटाही जिल्हा रुग्णालयात सुरू असतो. त्यावरही प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. अनेकदा त्यांनी आंदोलने केली, तरीही कारकुनांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाची पूर्तता करून घेता आलेली नाही. रुग्णांना लागणारी अत्यावश्‍यक औषधेही बऱ्याच दिवसांपासून उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाहेरून औषधे लिहून द्यावी लागत आहेत. रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे योग्य लक्ष नाही. परिसरातील बागांची योग्य दखल न घेतल्याने त्या ओस पडल्या आहेत. अशा विविध प्रश्‍नांनी जिल्हा रुग्णालय ग्रासले आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या सकारात्मक मानसिकतेच्या अभावी प्रश्‍न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच गेले आहेत. 

तीन वर्षांत होत्याचे नव्हते झाले...! 
डॉ. सुरेश जगदाळे हे जिल्हा शल्यचिकित्सक असताना जिल्हा रुग्णालयातील कामकाजात आमूलाग्र बदल झाला. या रुग्णालयाने कायाकल्प योजनेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. मात्र, जिल्ह्यात आदर्श ठरलेल्या या रुग्णालयाला त्यांच्यानंतर घरघर लागली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांना मृदू स्वभावामुळे कोणावरच नियंत्रण मिळवता आले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT