dhamane
dhamane 
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. दाभोळकर, डॉ. धामणे दांपत्यांना  डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानचे पुरस्कार 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा साहित्यसेवा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत व शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (सातारा) आणि समाजसेवा पुरस्कार डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे (शिंगवे, जि. नगर) यांना जाहीर झाला आहे. 

येत्या शनिवारी (ता.28) सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. फडकुले सभागृहात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी 25 हजार रुपये आणि मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरुप आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव बिपीनभाई पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी डॉ. मीरइसहाक शेख, दत्ता गायकवाड,बाबूराव मैंदर्गीकर, रविकिरण पोरे उपस्थित होते. 

डॉ. दाभोळकर हे दिल्लीतील श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च या संसोशन संस्थेचे माजी संचालक आहेत. शंभराहून अधिक पेटन्टस्‌ आणि अनेक संशोधनपर निबंध, तीसहून अधिक विद्यार्थ्यांना डॉक्‍टरेटसाठी मार्गदर्शन त्यांनी केले आहे. मराठी साहित्यातील भरीव योगदानाबद्दल त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाने साहित्यसम्राट न. चि. केळकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. विज्ञानेश्‍वरी, बखर राजधानीची, प्रकाशवाटा, माते नर्मदे, शोध स्वामी विवेकानंदांचा, ना डावे-ना उजवे ही काही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. 

डॉ. धामणे दांपत्यांना बेघर, मनोरुग्णांचा सांभाळ करणे, शारीरीक दृष्ट्या आजारी असलेल्यांची आयुष्यभर काळजी घेणे, बेघर व आश्रित महिलांसाठी अतिदक्षता विभाग चालविणे, शारीरीकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या महिलांची काळजी घेणे, मनोरुग्ण महिला व मुलांचा सांभाळ करणे या कार्यासाठी आतापर्यंत विविध संस्थांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. दी वन इंटरनॅशनल ह्युमेमेरीदीन ऍवॉर्ड 2016 ने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हॉंकगॉंग येथील रोटरी इंटरनॅशनलने हा एक लाख युएसए डॉलर्सचा पुरस्कार दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT