bhigwan
bhigwan 
पश्चिम महाराष्ट्र

लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे इंदापुर तालुक्यात दुष्काळ - हर्षवर्धन पाटील

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण - वीस वर्षांमध्ये सत्तेत असताना इंदापुर तालुक्याच्या पाण्याची कधी अडचण होऊ दिली नाही. सध्या इंदापुर तालुक्यातील मदनवाडीपासुन तरंगवाडीपर्यंतचे सर्व तलाव कोरडे आहेत. एका बाजुला दौंड तालुक्यातील सर्व तलाव भरले असताना इंदापुर तालुका मात्र पाण्यासाठी टाहो फोडतो आहे. तालुक्यातील ही दुष्काळीस्थिती निसर्गनिर्मित नाही तर लोकप्रतिनिधीच्या निक्रियतेचा हा दुष्काळ आहे अशी टिका राज्याचे माजी सहकार व ससंदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

डिकसळ (ता.इंदापुर) येथे विकासकामांचे उदघाटन व भुमिपुजन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी प्रभाग क्र. एक काँक्रीट रस्ता, प्रभाग क्र. दोन दलित वस्ती काँक्रिट रस्ता यांचे भुमिपुजन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप व संरक्षक भिंती आदी कामाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप होते पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, रमेश जाधव, यशवंत वाघ, हनुमंत काजळे, अशोक शिंदे, संपत बंडगर, रंगनाथ देवकाते, शामराव परकाळे,रणजित भोंगळे, संजय रायसोनी,तुषार खराडे, सुनिल काळे, सतीश काळे, सरपंच सुर्यकांत सवाणे, उपसरपंच सायली गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

श्री. पाटील पुढे म्हणाले, भिगवण पंचायत समिती गणांमध्ये समाजकल्याण विभागाकडुन ३८ लाख रुपयांचा निधी आणला आहे. शिरसोडी येथील वीजउपकेंद्र कॉंग्रेसनेच मंजुर केले होते त्याची उद्घाटने मात्र विरोधक करत आहे. 

सभापती करणसिंह घोलप म्हणाले, तुम्ही विकास कामे करता मग आम्ही काय गोट्या खेळतो काय? असा सवाल उपस्थित करत कॉंग्रेसने केलेल्या पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाचेही श्रेय विरोधक लाटत असल्याची टिका त्यांनी केली. पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक व तसेच सार्वजनिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे त्याचा लोकांना लाभ घ्यावा. सुहास गायकवाड गावाच्या विकासाचा आराखडा मांडला. 

प्रास्ताविक शिवदास सुर्यवंशी यांनी केले सुत्रसंचालन देविदास कुंभार यांनी केले आभार नवनाथ सावंत यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन अजिनाथ गायकवाड, लता काळे, लक्ष्मण कुंभार, मारुती शिंदे, पप्पु भोंग आदींनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT