mohol
mohol 
पश्चिम महाराष्ट्र

'दुष्काळाला कोणीही घाबरू नये, शासन तात्काळ उपाययोजना करेन'

राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळ तालुक्यात तीव्र दुष्काळ आहे, हे मी वस्तुस्थिती पाहिल्यावर लक्षात आले. तालुक्याला जास्तीत जास्त मदत करून, चारा टंचाई व पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना करू. आज पाहिलेली वस्तुस्थिती मुख्यमंत्र्याच्या कानावर घालुन तसा अहवाल देणार आहे. मात्र दुष्काळाला कोणीही घाबरू नये, शासन तात्काळ उपाययोजना करीत असुन राजकारण करण्याची ही वेळ नाही, असा धीर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिला.

मंत्री देशमुख यांनी मोहोळ तालुक्यातील देवडी व वाफळे या गावांचा दुष्काळी दौरा केला व वस्तुस्थितीची पाहणी केल्यावर त्यांनी देवडी ग्रामस्थांशी संवाद साधला व 
धीर दिला. देशमुख यांनी देवडी येथील शेतकरी उत्तम जयसिंग पाटील यांच्या कांदा पिकाची पाहणी केली, त्यांनी तीन हजार रुपये प्रती टँकर पाणी विकत घेऊन कांदा जगविल्याचे सांगितले. दुसरे शेतकरी सुरेश पाटील यांनी घेवडा पिक घेतले आहे, पिक चांगले आले होते पण पाण्याअभावी ते खर्च करून सोडुन दिल्याची व्यथा मांडली.

यावेळी ग्रामस्थांनी आष्टी उपसा सिंचन योजनेतुन पाणी मिळावे तसेच 1997 साली मंजुर झालेली सिना माढा योजना रखडली, ती केवळ स्थानीक लोकप्रतिनीधींनी न केलेल्या पाठपुराव्यामुळेच. त्यामुळे तिचे काम सुरू करावे, जो कोणी आंम्हाला पाण्यासाठी मदत करेल त्याला आंम्ही सहकार्य करू असेही ग्रामस्थ सांगावयास विसरले नाहीत. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी केल्या. पालकमंत्री देशमुख यांनी या योजनेचा मला प्रस्ताव दया, मला आजपर्यंत कोणीही याबाबत सांगितले नाही, मी चौकशी करुन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याबरोबर ग्रामस्थांची बैठक आयोजित करू व पाठपुरावा करुन पाणी प्रश्न निकाली काढू अशी ग्वाही दिली.

यावेळी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी दुष्काळाबाबतची व भागाची तिव्रता सांगितली प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार जीवन बनसोडे यांनी तालुक्याचा दुष्काळी आढावा कसा तयार केला याबाबत माहिती दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश काळे, संजय क्षीरसागर, सतीश पाटील, सौदागर खडके, डॉ. अमित व्यवहारे, प्रभाकर देशमुख, समता गावडे, साधना देशमुख आदी सह खंडाळी पापरी चिखली गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख यांनी या केल्या सुचना 
कांद्याचा पिक विमा भरून घ्या
चाऱ्यासाठी वैरण विकास प्रकल्प राबवा 
पेरणी केली पण पिक जळाले त्याचाही विमा भरून घ्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT