students
students 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षणाला कंटाळून मुले, तर प्रेमप्रकरणामुळे मुली गायब 

परशुराम कोकणे

सोलापूर : शिक्षणासाठी घरातून होत असलेली बळजबरी आणि गरिबीला कंटाळून अनेक सामान्य कुटुंबातील मुले घर सोडून जात आहेत. तर प्रेम प्रकरणात ओळखीच्या व्यक्तीसोबत मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढत आहे. या घटनांवर नियंत्रणासाठी पोलिस आयुक्तालयातील मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. 

पोलिस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोलापूर शहरासह सोलापूर ग्रामीण, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्याची जबाबदारी आहे. 14 ते 18 वयोगटातील मुला-मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. 18 वर्षांखालील मुले-मुली बेपत्ता झाल्यानंतर कायद्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. चार महिन्यांनंतरही ते सापडले नाहीत तर त्यांचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे दिला जातो, असे निरीक्षण कक्षाचे प्रमुख पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले. जबरदस्तीने अपहरण केल्याचे एकही प्रकरण नाही. सोलापुरातील सात प्रकरणे प्रलंबित असून बेपत्ता मुला-मुलींचा शोध चालू आहे. 

मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांवर नियंत्रणासाठी आम्ही शाळा-महाविद्यालयांत प्रबोधन कार्यक्रम आयोजित करतो. तसेच महिला बचत गटातील सदस्यांसोबत चर्चा करतो. 
- संजय पवार, 
पोलिस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष 

तो करायचा ढाब्यावर काम.. 
परभणी जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील 14 वर्षाच्या मुलास पालकांनी वसतिगृहावर ठेवले होते. शिक्षणाची आवड नसल्याने तो वसतिगृहातून पळून पंढरपुरात आला. तिथे त्याने वडापावच्या गाड्यावर काम केले. त्यानंतर तो कुर्डुवाडीतील एका ढाब्यावर नाव बदलून काम करत होता. अधूनमधून तो ढाबा मालकाचा मोबाईल घेऊन गावातील मित्रांना संपर्क साधायचा. त्यावरून त्याचा शोध घेऊन त्याला पालकांच्या ताब्यात दिले. 

बेपत्ता मुलींची संख्या अधिक 
2015 पासून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे 72 प्रकरणे दाखल झाली आहेत. यापैकी 36 मुला-मुलींचा शोध घेण्यात यश आले आहे. सध्या 36 प्रकरणे प्रलंबित आहेत. या 36 प्रकरणांत मुलींची संख्या 30 तर मुलांची संख्या सहा इतकी आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT