Dummy students found in Talathi exam
Dummy students found in Talathi exam 
पश्चिम महाराष्ट्र

परीक्षेपूर्वीच भावी भाऊसाहेबांचा भ्रष्टाचार 

सकाळ वृत्तसेवा

नगर : महसूल विभागाच्या तलाठीपदाच्या परीक्षेसाठी डमी परीक्षार्थी बसविल्याच्या गुन्ह्यात 10 जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील तीन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. 

बुलडाणा, जालन्याचेही आरोपी 
जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागाचे अव्वल कारकून जीवन सुतार यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विशाल सखाराम इंगळे (वय 24, रा. बावणे, श्रीरामपूर, जि. यवतमाळ), मंगेश कुंडलिक दांडगे (वय 34, रा. सुरंगळी, जि. जालना), अंजली गोपाल म्हस्के (वय 24, रा. चैतन्यवाडी, जि. बुलडाणा), पंढरीनाथ पुंजाजी साबळे, रवी जंगल पवार व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल इंगळे, मंगेश दांडगे, अंजली म्हस्के, पंढरीनाथ साबळे व रवी पवार यांच्या जागी डमी परीक्षार्थी बसविले गेले होते. यातील विशाल, मंगेश व अंजली यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी पसार आहेत. 

टंकलेखन परीक्षेतही बसले होते डमी 
अटक केलेल्या तिघांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी अधिक तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. गेल्याच आठवड्यात संगणक टंकलेखन परीक्षेतही डमी परीक्षार्थी बसलेले आढळून आले होते. त्यामुळे नगर शहरात डमी परीक्षार्थींचे पेव फुटल्याची चर्चा रंगली होती. 

दक्षतेमुळे प्रकार उघडकीस 
अनुसूचित जाती संवर्गातील तलाठी व वाहनचालक पदभरतीतील फसवणुकीचा प्रकार प्रशासनाच्या दक्षतेमुळे उघडकीस आला. परीक्षेदरम्यान परीक्षार्थींची व्हिडिओग्राफी करण्यात आली होती. यातूनच हा प्रकार निष्पन्न झाला. दहा जणांविरुद्ध प्रशासनाने तोफखाना पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधान संहितेनुसार फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. याल संदर्भात परीक्षा केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT