पश्चिम महाराष्ट्र

मिरज-कोल्हापूर रेल्वे मेमध्ये विजेवर

सकाळवृत्तसेवा

हातकणंगले - मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात उर्वरित काम पूर्ण होऊन मेअखेरीस या मार्गावरून विजेवर रेल्वे धावण्याची शक्‍यता आहे. यामुळे रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेसह प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर दुहेरीकरण (डबल ट्रॅक) आणि विद्युतीकरण या दोन मागण्यांपैकी पहिल्या टप्प्यात विद्युतीकरणास मंजुरी मिळाली असल्याने हे काम पूर्ण होत आले आहे. दुहेरी ट्रॅकला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाने कोल्हापूर-मिरज-पुणे या रेल्वेच्या विद्युतीकरणांसाठी निधी मंजूर केला होता.

३२६ किलोमीटरच्या मार्गासाठी ५३१७ कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानंतर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सध्या काम अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

सध्या कोल्हापूरला येणाऱ्या व सुटणाऱ्या रेल्वेची इंजिन डिझेलवर चालणारी आहेत. कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचा लाभ पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांबरोबरच कोकणालाही होणार आहे. शिवाय यामुळे अनेक रेल्वेगाड्याही सुरू होण्यास मदत होणार आहे.

दृष्टिक्षेपात 

  •   रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा पाठपुरावा
  •   २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात मंजुरी
  •   ३२६ किलोमीटरच्या मार्गासाठी ५३१७ कोटी निधी
  •   दोन महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्‍यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT