suside.jpg
suside.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढ्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : तालुक्यातील अकोला येथील रहिवाशी असलेला व कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या बी. टेकच्या अंतीम वर्षात शिकत असलेला धर्मराज दत्तात्रेय इंगळे (वय 21) याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 

आत्महत्येपुर्वी ताे कॉलेजमध्ये झालेला अपमान सहन न झाल्याने मी आत्महत्या करणार असे, मित्रांना व आईवडिलांना म्हणत होता. तसेच तो सगळ्यांना सॉरी म्हणून माफी देखील मागत होता. त्यामुळे या आत्महत्येमागील नेमके कारण शोधून काढण्याची मागणी धर्मराजच्या कुटुंबाकडून होत आहे.

त्याच्या पश्यात आई, वडील एक भाऊ असा परिवार आहे. तो कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थी होता. परंतू गावाकडे येण्यापूर्वी दोन दिवस ताे कोणत्यातरी मानसिक तणावाखाली होता. अशी त्याच्या कुटुंबाची माहिती आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये धर्मराज शिकत आहे. तो बीटेकच्या अंतीम वर्षात आहे.

शुक्रवारी धर्मराजच्या मित्रांचा त्याच्या आईवडिलांना फोन आला की, तुमचा मुलगा माझा कॉलेजमध्ये अपमान झाला आहे, त्यामुळे मी आत्महत्या करणार आहे; असे म्हणत आहे.  त्यामुळे त्याला बसमध्ये बसवून गावाकडे पाठवून दिले आहे.

सायंकाळी सहा वाजता घरी आल्यानंतर देखील तो मी आत्महत्या करणार असल्याचे सांगत असल्याने कुटुंब त्याच्यावर लक्ष ठेवून होते. परंतू त्याने घरच्यांचे लक्ष चुकवून विषारी तणनाशक प्राशन केले. त्यास उपचारासाठी सोलापूरकडे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची मंगळवेढा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT