Environmental Protection Message from Tree Plantation at solapur
Environmental Protection Message from Tree Plantation at solapur 
पश्चिम महाराष्ट्र

कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या निधनाचे दुःख बाजूला सारुन रक्षाविसर्जन

किरण चव्हाण

माढा (जि. सोलापूर) : रिधोरे (ता. माढा) येथील (कै.) काशिनाथ माने यांचे मित्रमंडळ, कुटुंबीय व ग्रामस्थांच्या मदतीने कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीच्या निधनाचे दुःख बाजूला सारत रक्षाविसर्जनदिवशी झाडं लावून झाडाच्या आळ्यामध्ये रक्षाविसर्जन करून कृतीशील पर्यावरण पूरक संदेश देऊन समाजापुढे एक चांगला आदर्श रिधोरेकरांनी निर्माण केला आहे. 

रिधोरे येथील काशिनाथ माने (वय 43) यांचे 14 मे ला निधन झाले. रिधोरे गावातील पदवीधर व उत्तम शेती करणारे काशिनाथ यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मित्रपरिवाराने कुटुंबियांना रक्षाविसर्जनादिवशी झाडे लावून त्यात रक्षा विसर्जन करण्याचा सुचवले. (कै.) माने यांचे पुतणे गणेश व कुटुंबीयांनी मित्र परिवाराच्या सूचनेला मान देत रक्षा विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. 16) (कै.) माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक झाड लावून त्यात एक पाटी रक्षा विसर्जित केली. (कै‌.) माने यांचा अकरा वर्षाचा मुलगा अर्जून याने झाड लावून त्यात रक्षा विसर्जीत केल्या. (कै.) माने यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. माने कुटुंबीयांनी आपले दुःख बाजूला सारत पर्यावरण पूरक व पर्यावरण संवर्धनाच्या विचारांच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल स्तुत्य असून अनुकरणीय आहे. या उपक्रमाने रिधोरे ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनास चांगली चालना दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT