Satara
Satara 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी सैनिकही पुढे

सकाळ वृत्तसेवा

नागठाणे (जि. सातारा) ः कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. प्रशासन अन्‌ पोलिसांवरचा ताणही वाढत आहे. मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. अशा स्थितीत येथील माजी सैनिकांनी सामाजिक बांधिलकीचे आगळे दर्शन घडविले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते आपल्या वर्दीनिशी पोलिस अन्‌ प्रशासनाला साथ देण्यासाठी रणात उतरले आहेत. 

नागठाणे हे सातारा तालुक्‍यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव. तालुक्‍यातील सर्वांत मोठी बाजारपेठ. परिसरातील 50 हून अधिक गावांचा येथील बाजारपेठेशी नित्याचा संपर्क असतो. महामार्गावरील महत्त्वपूर्ण ठिकाण असल्यामुळे येथे सतत गर्दी असते. अलीकडच्या काळात लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर येथील बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होऊ लागली. अशा स्थितीत पोलिस तसेच प्रशासनासाठी ही गर्दी डोकेदुखीचा विषय बनली. अपुऱ्या मनुष्यबळामुळेही यंत्रणांवरचा ताण वाढू लागला. अशावेळी येथील सैन्यदलातून निवृत्त झालेले सैनिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. 
बोरगाव पोलिस ठाण्याच्या वतीने येथे गर्दीवर नियंत्रणासाठी नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पुरेशा संख्याबळाअभावी तिथेही मर्यादा पडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर येथील ग्रामपंचायतीने गावातील निवृत्त सैनिकांना मदतीला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कॅप्टन दिलीप मोहिते, किरण नलवडे, प्रमोद साळुंखे, अजित जगन्नाथ साळुंखे, अजित हणमंत साळुंखे, विशाल खुळे हे निवृत्त सैनिक पुढे आले आहेत. शुभम नलवडे, ऋषिकेश नलवडे, दीपक नलवडे या गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांचीही त्यांना साथ लाभत आहे. गावातील मुख्य रस्त्यावरून फिरून कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षतेबाबत ते लोकांचे प्रबोधन करतात. लोकांनी घरात थांबण्याविषयीही जागृती करतात. 
किरणकुमार साळुंखे, महिबूब चांदकोटी, सुनील राजे, गणेश शेलार, 
शुभम बागल, विकास कांबळे हे ग्रामपंचायतीचे कर्मचारीही या मोहिमेत उतरले आहेत. 


""सीमेवर लढणारे सैनिक हे सर्वांसाठीच अभिमानाचा विषय आहेत. सध्याच्या कसोटीच्या काळात नागठाण्यातील माजी सैनिकांचे गावासाठी, समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान लाभत आहे, ते कौतुकास्पद आहे.'' 
-विष्णू साळुंखे-पाटील, 
सरपंच, नागठाणे, ता. सातारा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT