KGN20A01490_pr.jpg
KGN20A01490_pr.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाची धास्ती ,  कडेगावात शुकशुकाट 

सकाळवृत्तसेवा

कडेगाव (सांगली) : तालुक्‍यात कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच कडेगाव शहरात काल रविवारी कोरोनाचा रुग्ण सापडल्याने शहरात दोन दिवसासाठी जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.तर जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी आज शहरांत सर्वत्र कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला.त्यामुळे शहरासह संपूर्ण बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. 

आज सोमवारी व उद्या मंगळवारी दोन दिवस कडकडीत शंभर टक्के जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय येथील नागरिक व व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे.या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करीत जनता कर्फ्यूला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

दरम्यान कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.शहरात दवाखाने व मेडिकल वगळता किराणा,कृषी औषधे दुकाने,दूध डेअरी आदी जीवनावश्‍यक सेवा सर्व बंद ठेवण्यात आल्याने शहरात शांतता पसरली आहे.कोरोना या रोगाने सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. 


तर तालुक्‍यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 27 वर पोहोचली आहे.तर कडेगाव हे तालुक्‍याचे ठिकाणी असल्याने येथे तालुक्‍यातील 55 गावांतील लोकांचा विविध कामानिमित्त दररोज संपर्क असतो.

त्यामुळे तालुका प्रशासन,पोलीस व येथील नागरिकांनी येथे शहरांत कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी विशेष प्रयत्न व काळजी घेतली होती.परंतु शहरांत अखेर कोरोनाने प्रवेश केलाच.येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने कडेगाव शहरात व तालुक्‍यात भीतीचे वातावरण आहे. शहरात या कोरोनाचा फैलाव होऊ नये असा निर्धार येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी केला आहे. 


कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रशासन आणि पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.घराबाहेर पडू नये यासाठी लोकांना वारंवार आवाहन करीत आहेत.

तर प्रशासनाने तालुक्‍याच्या सर्व सीमा सील केल्या आहेत.पोलीस प्रशासनाने लॉक डाऊनच्या कालखंडात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.तर अत्यावश्‍यक सेवा लॉक डाउन मधून वगळण्यात आल्या आहेत.तर अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली अनेक जण विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत.

त्यांना पोलिसांनी चांगलाच खाक्‍याही दाखवला आहे.तेव्हा नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे.कोरोनाच्या धोका टाळण्यासाठी व शहरांत कोरोना मुक्त रहावा यासाठी सर्वांनी घरी राहावे असे यासाठी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
..................... 


.............................................................................................. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT