File a crime, still will open shops; cleared traders in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

गुन्हे दाखल करा, तरीही दुकाने सुरु ठेवणार; सांगलीतील व्यापाऱ्यांची भूमिका

बलराज पवार

सांगली : बंदच करायचे तर सगळंच बंद करा, मात्र बिअरबार सुरु, भाजीपाला सुरु आणि व्यापारपेठा बंद हे चालणार नाही. आम्ही आमचे वाटोळे करुन घेणार नाही. प्रसंगी गुन्हे दाखल करा, पण आम्ही दुकाने सुरुच ठेवणार असा इशारा आज व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला. तर एप्रिल महिना धोकादायक आहे. व्यापाऱ्यांनी महापूर आणि कोरोनाशी 24 महिने लढा दिला आहे. आता कोरोना नियमाचे उल्लघंन करुन टोकाची भूमिका करु नका, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यापारी संघटनांच्या बैठकीत केले. 

शासनाच्या आदेशाप्रमाणे आजपासून सर्व अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवा असे आदेश काढले त्याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र हरभट रोड, कापड पेठ, सराफ असोसिएशन, बालाजी चौक यासह सर्व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवत दिवसभर व्यापार सुरुच ठेवला. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त कापडणीस यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. या बैठकीस व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा, अतुल शहा, किराणा दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अरुण दांडेकर, विराज कोकणे, प्रसाद मद्भावीकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी सर्वच व्यापाऱ्यांनी व्यापार बंदला विरोध केला. पाडव्याला उलाढाल होणार म्हणून व्यापारी वर्गाने माल भरुन ठेवला. कोरोनाचे नियम पाळून व्यापार करायला तयार आहोत, मात्र महिनाभर व्यापार बंद हे आम्हाला मान्य नाही. 


व्यापाऱ्यांची बाजू ऐकल्यानंतर आयुक्त कापडणीस म्हणाले, शासनाबरोबर चर्चा सुरु आहे. महापुर, कोरोनाशी 24 महिने झगडलात. आणखी 24 दिवस सहन करा. व्यापारी वर्गानी दुकानातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्या. पालकमंत्रीही तुमच्या मागणीशी सकारात्मक आहेत. तुमच्या सर्व भावना सरकारला कळवतो. तोपर्यत सर्वानी सहकार्य करा असे आवाहन केले. 

आता व्यापाऱ्यांच्या आत्महत्या अनुभवाल 
महापुर, कोरोनामुळे व्यापार उध्वस्त झाला आहे. ऑनलाईनमुळे व्यापारी वर्गाचे कबंरडे मोडले आहे. पुन्हा कोरोनामुळे दुकाने बंद ठेवायला लागले तर आजवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुभवल्या, यापुढे व्यापारी वर्गाच्या आत्महत्या सुरु होतील अशी भिती अनेक व्यापाऱ्यांनी आयुक्तांसमोर बोलताना व्यक्त केली. 

आदेश धुडकावून दुकानं सुरू करू
आयुक्तांनी व जिल्हाधिकारी यांनी, सदर आदेश हे राज्यसरकारचे आहेत. त्यात कोणताही बदल किंवा शिथिलता देण्याचे अधिकार आम्हास नाहीत. हे स्पष्ट केले. आम्ही, राज्यसंघटने मार्फत ठोस प्रयत्न करत आहोत. दोन दिवसात हा पेच सुटेल यात शंका नाही. तोपर्यंत कोणतेही कायदेशीर उल्लंघन होऊ नये. उद्यापासून प्रशासन कारवाई करण्याच्या मनःस्थितीत आहे. जर सकारात्मक निर्णय सरकारने घेतला नाही तर सर्व आदेश धुडकावून दुकानं सुरू करू. 
- समीर शहा, व्यापारी एकता असोसिएशन 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT