savedi masap first price
savedi masap first price 
पश्चिम महाराष्ट्र

सावेडी मसापच्या "वारसा'ला प्रथम पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा

नगर : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेच्या वारसा दिवाळी अंकास आणखी एक पुरस्कार मिळाला आहे. मुंबईतील पाणिनी फौंडेशन संस्थेने या दिवाळी अंकाचा गौरव केला आहे. सावेडी शाखेचे कार्याध्यक्ष जयंत येलूलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

75 दिवाळी अंकातून झाली निवड 
या सोहळ्यासाठी पाणिनी फौंडेशनच्या संगीता चव्हाण, बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, सोनिया फातरेकर आदी मंडळी उपस्थित होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातून तब्बल 75 दिवाळी अंक सहभागी झाले होते. अंकाची मांडणी, सजावट आणि त्यातील लेखांचे मूल्यमापन करून हा पुरस्कार देण्यात आला. सलग चौथ्या वर्षी हा दर्जेदार अंक प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंकात महाराष्ट्रात नामांकित साहित्यिक तसेच नवकवींना, साहित्यिकांना स्थान देण्यात आले आहे. 

शांतिकुमार फिरोदिया फौंडेशनचे सहकार्य 
सावेडी उपनगर शाखेने यापूर्वी विभागीय साहित्य संमेलन आयोजित केले होते. तेही दर्जेदार संमेलन होते, अशी पावती महाराष्ट्रातील अनेकांनी दिली. शांतिकुमार फिरोदिया फौंडेशनच्या माध्यमातून सावेडी उपनगर शाखा अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवित असते. दिवाळी अंक हा त्यातीलच एक उपक्रम होता. अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा अनोखे उपक्रम राबवित असते. 

अनोखे कार्यक्रम

या अंकासाठी किरण गवते, शशिकांत शिंदे, वैशाली मोहिते, अरविंद्र ब्राह्मणे या संपादक मंडळाने परिश्रम घेतले. सावेडी मसाप शाखा स्थापन झाल्यापासून साहित्याच्या वाढीसाठी अनोखे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उत्कृष्ट साहित्यिकास पुरस्कार दिला जातो. शाखेचे कार्याध्यक्ष जयंत येलूलकर हे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवित असतात.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT