fish dead in panchganga river
fish dead in panchganga river 
पश्चिम महाराष्ट्र

तेरवाड बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच

सकाळ वृत्तसेवा

तेरवाड बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच 
पंचगंगा काठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात 

कुरुंदवाड (कोल्हापूर)  ः दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीपात्रातील मासे मृत झाले असून तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे. दूषित पाणी व मृत मासे यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. 

पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्‍यातील सत्तावीस गावांना बसतो. पिण्यासाठी व शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जातो. उन्हाळ्यात पात्रातील पाण्याचा प्रवाह थंडावल्याने दूषित पाण्याची तीव्रता अधिक जाणवते. गत आठवड्यात नदीला काळेकुट्ट पाणी आले होते. याकडे जिल्हा प्रशासन अथवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केले होते. आता पाण्याला उग्र वास येत असून मृत मासे खाण्यासाठी पक्ष्यांचे थवे नदी काठावर घिरक्‍या घालत आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबर पशुधन, शेती धोक्‍यात आली आहे. 

आदेशाला वाटाण्याच्या अक्षता 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गत महिन्यात नदी पात्रातील पाण्याची अवस्था, इचलकरंजी शहरातील सांडपाणी निर्गतीची व्यवस्था पाहणी करून संबंधित विभागाला आदेश दिले होते; परंतु नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT