fish market
fish market sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव शहरात आता फीश मार्केट देखील स्मार्ट होणार !

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: कॅण्टोन्मेंट हद्दीतील फिश मार्केट १ कोटी रुपयांतून स्मार्ट केले जाणार आहे. यापूर्वी या फीश मार्केटचा ५० लाख रुपये निधीतून कायापालट केला जाणार होता. मात्र, पन्नास लाखांच्या निधीतून स्मार्ट फीश मार्केट उभारताना अडचणी येणार असल्याने यासाठी एक कोटी रुपये निधी मंजुर झाला आहे. यामुळे बेळगावकरांना स्मार्ट फिश मार्केटमधून फीश खरेदी करता येणार आहेत.

बेळगाव शहरात स्मार्ट सिटीतून अनेक विकासकामे राबविली जात आहेत. यामध्ये बस स्थानक, रेल्वे स्थानक, स्मार्ट रस्ते आदींचा समावेश आहे. आता फीश मार्केट देखील स्मार्ट होत आहे. आमदार अनिक बेनके यांनी पाठपूरावा करून या स्मार्ट फिश मार्केटसाठी पहिल्यांदा ५० लाखांचा निधी मंजुर करून आणला होता. मात्र, इतक्या रकतमेतून काम होणार नसल्याने हा निधी कसाई गल्लीतील फिश मार्केटसाठी वळविण्यात आला आहे. त्या ठिकाणी काम सुरु झाले आहे. यामुळे कॅण्टोन्मेंट हद्दीतील फिश मार्केटसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्यातील पुढील अधिवेशनानंतर या कामालाही चालना मिळणार असल्याची माहिती मिळाली.

या स्मार्ट फिशमार्केटसाठी कॅण्टोन्मेंट बोर्डाकडून यापूर्वी परवानगी मिळाली आहे. निधी आल्यानंतर या कामाला चालना मिळणार आहे. या स्मार्ट फीश मार्केटमध्ये प्रत्येकाला गाळे, स्वच्छतागृह आदी सोयी व सुविधा दिल्या जाणार आहेत. या मार्केटचे काम सुरु असताना सध्या असलेल्या व्यापाऱ्यांना तिथेच जवळ तात्पूरती विक्री करण्यासाठी जागा दिली जाणार आहे. फिश मार्केट स्मार्ट झाल्यास बेळगावच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.

कॅण्टोन्मेंट हद्दीतील फीश मार्केटसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. यापूर्वी ५० लाखांचा निधी मंजुर झाला होता. तो निधी आता कसाई गल्लीतील फीश मार्केटला वापरण्यात आला आहे. पुढील अधिवेशनानंतर विकासकांमांना सुरुवात केली जाईल.

अनिल बेनके, आमदार कॅण्टोन्मेंट हद्दीतील फिश मार्केट १ कोटी रुपयांतून स्मार्ट केले जाणार आहे. यापूर्वी या फीश मार्केटचा ५० लाख रुपये निधीतून कायापालट केला जाणार होता. मात्र, पन्नास लाखांच्या निधीतून स्मार्ट फीश मार्केट उभारताना अडचणी येणार असल्याने यासाठी एक कोटी रुपये निधी मंजुर झाला आहे. यामुळे बेळगावकरांना स्मार्ट फिश मार्केटमधून फीश खरेदी करता येणार आहेत.

बेळगाव शहरात स्मार्ट सिटीतून अनेक विकासकामे राबविली जात आहेत. यामध्ये बस स्थानक, रेल्वे स्थानक, स्मार्ट रस्ते आदींचा समावेश आहे. आता फीश मार्केट देखील स्मार्ट होत आहे. आमदार अनिक बेनके यांनी पाठपूरावा करून या स्मार्ट फिश मार्केटसाठी पहिल्यांदा ५० लाखांचा निधी मंजुर करून आणला होता. मात्र, इतक्या रकतमेतून काम होणार नसल्याने हा निधी कसाई गल्लीतील फिश मार्केटसाठी वळविण्यात आला आहे. त्या ठिकाणी काम सुरु झाले आहे. यामुळे कॅण्टोन्मेंट हद्दीतील फिश मार्केटसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्यातील पुढील अधिवेशनानंतर या कामालाही चालना मिळणार असल्याची माहिती मिळाली.

या स्मार्ट फिशमार्केटसाठी कॅण्टोन्मेंट बोर्डाकडून यापूर्वी परवानगी मिळाली आहे. निधी आल्यानंतर या कामाला चालना मिळणार आहे. या स्मार्ट फीश मार्केटमध्ये प्रत्येकाला गाळे, स्वच्छतागृह आदी सोयी व सुविधा दिल्या जाणार आहेत. या मार्केटचे काम सुरु असताना सध्या असलेल्या व्यापाऱ्यांना तिथेच जवळ तात्पूरती विक्री करण्यासाठी जागा दिली जाणार आहे. फिश मार्केट स्मार्ट झाल्यास बेळगावच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.

प्रतिक्रिया

कॅण्टोन्मेंट हद्दीतील फीश मार्केटसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. यापूर्वी ५० लाखांचा निधी मंजुर झाला होता. तो निधी आता कसाई गल्लीतील फीश मार्केटला वापरण्यात आला आहे. पुढील अधिवेशनानंतर विकासकांमांना सुरुवात केली जाईल.

अनिल बेनके, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT