fitness ideas for Mallakhamb game
fitness ideas for Mallakhamb game 
पश्चिम महाराष्ट्र

मल्लखांब खेळाचा "पिळदार' फिटनेस फंडा! 

सुयोग घाटगे

कोल्हापूर : कामच्या धबडग्यात स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. आज व्यायामासाठी आधुनिक-अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. त्यांचा वापर आज सर्रास केला जातो. स्वतःचा फिटनेस जपणे हे सर्वात महत्वाचे, हे ओळखूनच मिळेल त्या वेळेत मेहनत घेणाऱ्या मंडळी कमी नाहीत. मात्र, असे अनेक पारंपरिक व्यायामप्रकार आहेत की, ज्यामुळे सर्वोत्तम व्यायाम होण्यास मदत मिळते. मल्लखांब हा यातीलच एक प्रकार होय. 
संपूर्ण शरीराचा परिपूर्ण व्यायाम व्हावा या हेतूने अनेक पारंपरिक खेळांची आणि व्यायाम प्रकारांची बांधणी केली होती. चपळ, लवचिक शरीर आणि स्नायूंची ताकद वाढवणारे अनेक व्यायाम प्रकार होते. यामध्ये सर्वाधिक महत्वाचा आणि आजही महत्वपूर्ण असणारा व्यायाम प्रकार आणि खेळ म्हणजे मल्लखांब होय. या खेळामध्ये निपुण होण्यासाठी शारीरिक ताकदीबरोबरच मानसिक क्षमतेचाही कस लागतो. यात पारंगत होण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती आणि मेहनत अंगी असावी लागते. आणि हेच या खेळाचे वैशिष्ट्य आहे. 

काय आहे मल्लखांब? 
मल्लखांब हा एक व्यायामप्रकार आहे. तसेच हा एक कसरतींचा खेळ प्रकारही आहे. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यास मल्लखांब वापरला जात असे. हा कुस्तीला पूरक व्यायामप्रकार आहे.कमीतकमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडाप्रकार असे मल्लखांब खेळाचे वर्णन केले जाते. मातीच्या अखड्यामध्ये मधोमध एक गोलाकृती आणि वरील बाजूस चेंडू सारखा आकार दिलेला गोल अशी रचना असलेला खांब घट्ट रोवलेला असतो. या खांबाचा वापर खेळाडू विविध प्रकारचे व्यायाम काण्यासाठी केला जातो. व्यायाम करणाऱ्याच्या शरीराचे वजनच यामधील सर्वात महत्वाचे आहे. खांबाच्या मदतीने समतोल साधत जमिनीपासून उंचीवर शरीराचा भार पेलल्याने अधिक ऊर्जा खर्च केली जाते. शरीराची ताकद आणखी वाढण्यासाठी याचा मुख्यत्वे करून उपयोग होतो. मलखांब खेळ प्राचीन काळापासून खेळला जात असून, 1135 पासून लिखित दस्तऐवजांमध्ये मल्लखांब खेळाचा उल्लेख आहे. मल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना 29 जानेवारी 1981 रोजी उज्जैन, मध्यप्रदेश येथे झाली. ही राष्ट्रीय संघटना मल्लखांब फेडेरेशन इंडिया या नावाने ओळखली जाते. तेव्हापासून आजपर्यंत भारतातील 29 राज्यांच्या राज्य संघटनांची नोंदणी झालेली आहे. प्रतिवर्षी राष्ट्रीय संघटनेच्या वतीने खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. 

प्रचलित प्रकार : लाकडी मल्लखांब 
मल्लखांब हा सागवानी किंवा शिसवीच्या लाकडापासून बनवलेला स्तंभ असतो. याची उंची सुमारे साडेआठ फूट असते. हा खांब दंडगोलाकार, सरळ, गुळगुळीत व वर टोकाच्या बाजूला निमुळता असतो. या प्रकाराला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत घट्ट बसवलेला असतो. 

रोप मल्लखांब 
हा मलखांबाचा हलता प्रकार आहे. छताला अडकवून खाली लोंबत असलेल्या सुती दोरखंडाचा वापर मल्लखांबासारखा केला जातो. हा दोर वीस फूट लांब असतो. या सुताच्या दोराला नवार पट्टीचे आवरण केलेले असते. त्यामुळे दोरावर पकड करणे सोपे जाते. 

स्नायू पिळदार आणि दणकट बनवण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त असा हा व्यायामप्रकार आहे. याचा प्रामुख्याने वापर हा मल्ल (पैलवान) यांच्यासाठी होत असतो. योगासनाचे सर्व प्रकार हे एका खांबावर करण्याचीही पद्धत प्रचलित आहे. मल्लखांब खेळात निपुण असलेल्या व्यक्तीला कोणत्याही खेळात पारंगत होता येते. 
- विश्वास चोपडे, प्रशिक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT