पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरः हवाला लूट प्रकरणी पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता. 

या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ लाखांची रोकड, ३० लाख रुपये किमतीचे एक किलो सोने यासह गुन्ह्यात वापरलेली वाहने, असा ७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील संशयितांसह लुटीतील रक्कम वाढण्याची शक्‍यता पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी वर्तवली आहे. 

लक्ष्मण अंकुश पवार (वय २६, रा. खटकेवस्ती लिंगीवरे, ता. आटपाडी. जि. सांगली), गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (वय २६, रा. तमदलगे, ता. हातकणंगले), अविनाश बजरंग मोटे (वय २६), अक्षय लक्ष्मण मोहिते (वय २६), इंद्रजित बापू देसाई (वय २४, तिघे रा. हातकणंगले) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

सुशांत कदम आणि सागर सुतार यांची ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ ही कंपनी आहे. सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय या कंपनीद्वारे केला जातो. या कंपनीतील चालक चिंतामणी भगवान पवार व त्याचे दोन सहकारी मुंबई, पुणे येथे कंपनीचे व्यवहार करून मोटारीने शुक्रवारी पहाटे कोल्हापुरात आले.

यावेळी मोटारीत ५२ लाखांच्या रोकडसह दोन किलो सोने, असा एक कोटी १८ लाखांचा माल होता. राजेंद्रनगर येथील कंपनीच्या कार्यालयाकडे जात असताना अज्ञातांनी अचानक त्याच्या आडवी मोटार घालून कंपनीच्या मोटारीवर हल्ला चढवला. पवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करत मोटारीचा ताबा घेतला. त्यांना रत्नागिरीच्या दिशेने घेऊन गेले. त्यांना अर्धनग्न अवस्थेत आंबा घाटात वेगवेगळ्या ठिकाणी सोडून दिले. मोटारीमधील रोकड व सोने घेऊन संशयित पसार झाले.

याबाबत चालक चिंतामणी पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. राजारामपुरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास केला होता. गुन्ह्यात वापरलेली मोटार तसेच सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित व त्यांच्या पथकाला ही लूट लक्ष्मण पवारने मेहुणा गुंडाप्पा नंदीवाले व अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली.

मुख्य संशयित लक्ष्मण पवार हा नंदीवालेकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नंदीवाले याच्या तमदलगे येथील घरावर पाळत ठेवली असता तिथे एक मोटार आढळून आली. त्यात लक्ष्मण पवारसह नंदीवाले व अविनाश मोटे हे मिळून आले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर रोकड व सोने मिळून आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अक्षय मोहिते व इंद्रजित देसाई यांचा ही यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक करून त्यांच्याकडील रोकड जप्त केली. पत्रकार परिषदेवेळी अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सुनील पाटील उपस्थित होते. 

कारवाई केलेले पथक 
स्थानिक गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित, पोलिस हेड कॉन्स्टेबल इकबाल महात, राजू आडूळकर, शिवाजी खोराटे, अजित वाडेकर, सुरेश पाटील, राम कोळी, महादेव यादव, ओंकार परब, रणजित कांबळे, विलास किरोळकर, सुजय दवणे, अनिल पास्ते आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT