Five Students Fill Uncomfortable After Antibiotic Injection In Gadhinglaj
Five Students Fill Uncomfortable After Antibiotic Injection In Gadhinglaj  
पश्चिम महाराष्ट्र

ॲन्टीबायोटिक इंजेक्‍शनमुळे पाच विद्यार्थी अत्यवस्थ

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इंजेक्‍शनमुळे पाच विद्यार्थी अत्यवस्थ झाले. आज सकाळी ही घटना घडली. त्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

समर्थ कोले (वय ४), समर्थ गुरव (८), चैतन्य खवरे (९), सर्वेश पाटील (४), रोहित शेषनाईक (१०) अशी त्यांची नावे आहेत.
येथील उपजिल्हा रुग्णालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या मुलांना उपजिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. आजरा व चंदगड तालुक्‍यातील या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर गुरुवारी (ता. १२) शस्त्रक्रिया करण्यात आली.

उपचार सुरू 

अत्यवस्थ पाचही मुलांना ‘सीपीआर’मध्ये आज सकाळी दाखल केले. यातील तीन मुलांची प्रकृती अधिक गंभीर होती. त्यांच्यावर येथील बालरुग्ण विभागात उपचार सुरू असूनही पाचही मुलांची प्रकृती स्थिर आहे. या मुलांवर उपचार करण्यासाठी ‘सीपीआर’च्या चार तज्ज्ञ डॉक्‍टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी नियमित प्रकारच्या आजारांवरील शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यातील तीन मुलांची प्रकृती सुरवातीला खालावली. त्यानंतर अन्य दोन मुलांचीही प्रकृती खालावली. त्यानंतर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना पुढील उपचारांसाठी ‘सीपीआर’मध्ये पाठविण्यात आले. त्यानुसार मुलांवर ‘सीपीआर’मध्ये तातडीने उपचार सुरू आहेत, अशी माहिती ‘सीपीआर’च्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

उपचारांचा भाग म्हणून आज सकाळी या विद्यार्थ्यांना ॲन्टीबायोटिक इंजेक्‍शन दिले. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. उपचार करून त्‍यांना पुढील उपचारांसाठी सीपीआरमध्ये हलविले. उपचारानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. दिलीप आंबोळे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT