पश्चिम महाराष्ट्र

येरळवाडीत फ्लेमिंगोची पक्षीप्रेमींना मोहिनी 

अंकुश चव्हाण

कलेढोण - वरून पांढरे, आतून लाल पंख, उंच पाय, लांब चोच, इंग्रजीतील "एस' आकाराची मान, केळीच्या आकाराची चोच असलेल्या फ्लेमिंगोंनी (रोहित, अग्निपंख) गुलाबी थंडीत पक्षीप्रेमींना मोहिनी घातली आहे. खटाव तालुक्‍यातील येरळवाडी मध्यम तलावावर परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी कोल्हापूर, सांगली, पुणे, कऱ्हाड आदी भागातून पक्षीप्रेमी दुर्बिण व कॅमेरे घेऊन त्यांची छबी टिपण्यासाठी हजेरी लावत आहेत. 

दुष्काळी खटाव तालुक्‍यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पावर नोव्हेंबर ते मार्चदरम्यान हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो दाखल होतात. तालुक्‍यात कमी पावसामुळे अनेक तलावांत अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असला, तरी तलावावर अनेक विहार करताना परदेशी व स्थानिक पक्षी दिसत आहे. त्यांच्या निरीक्षणासाठी पुणे, कोल्हापूर, सांगलीसह जिल्ह्यातून पक्षीप्रेमी दाखल होत आहेत. त्यात वरून पांढरा, आतून लाल पंख, उंच पाय, लांब चोच, इंग्रजीतील "एस' आकाराची मान, केळीच्या आकाराची चोच असा रोहित पर्यटकांवर मोहिनी घालताना दिसत आहे. 

तलावाच्या पूर्वेला (बनपुरी हद्दीत) दलदलीच्या भागात हा पक्षी लहान खेकडे, मासे, कीटक, ओटोलिया वनस्पतीच्या शोधात मुक्त विहारताना दिसत आहेत. त्यांची छबी दुर्बिणी व कॅमेऱ्याच्या मदतीने टिपण्यासाठी पक्षीप्रेमी सकाळ, संध्याकाळ तलावावर हजेरी लावत आहेत. तलावात सुरू असलेल्या मासेमारीमुळे हे पक्षी आपली जागा वारंवार बदलत असताना दिसत आहेत. त्यामुळे पर्यटकांची चांगलीच तारांबळ होत आहे. तलावात फ्लेमिंगोबरोबर नदीसूरय, स्पून बिल, ग्रे हेरॉन, कवड्या खंड्या, चांदवा, पांढरापरीट, पाणकावळा, पाणबुडी, पाणपाकोळी, शराटी, शेकाट्या आदी पक्ष्यांनी हजेरी लावल्याने तलाव परिसर गजबजला आहे. 

""तलाव परिसराच्या पूर्व, उत्तर भागात झाडांची संख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे पक्षीप्रेमी व पक्षी समोरासमोर येत आहेत. त्यासाठी तालुका पाटबंधारे विभाग व वन विभागाच्या समन्वयाने येथे तात्पुरती लपनगृहे उभारण्याची गरज आहे.'' 
- प्रा. महेश जंगम (पक्षीप्रेमी, विटा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT