Crime
Crime 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक... आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

कुर्डू (सोलापूर) : येथे 30 ते 35 वर्षे वय असलेल्या अज्ञात व्यक्तीचा शस्त्राने खून करून मृतदेह जाळून टाकण्यात आल्याचे शुक्रवारी (ता. 17) उघड झाले. लऊळ - शिराळ (मा) रोडवर जोशी वस्तीजवळ ही घटना घडल्याचे समोर आले असून, मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
अंकुश रामचंद्र जोशी यांच्या शेतातील खड्ड्यात कडेला 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती मारुती निवृत्ती नलवडे यांनी लऊळचे पोलिस पाटील चंद्रकांत लोकरे यांना दिल्यानंतर, घटनेची खबर कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कसून पाहणी केली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृत व्यक्तीच्या डोक्‍यात, पोटात, गळ्यावर व मानेवर शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटू नये म्हणून व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शरीर व चेहऱ्यावर इंधन टाकून जाळल्याचे दिसून येते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून, याची परिसरात दुर्गंधी सुटल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत व्यक्तीच्या खिशात अर्धवट जळालेल्या नोटा
मृत व्यक्तीच्या पॅंटच्या खिशात अंदाजे 25 हजाराच्या 500 रुपयांच्या नोटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. मृताच्या डाव्या हाताला करंगळी व अंगठा वगळता तीन बोटे नसल्याचे व मृत व्यक्तीच्या अंगावर अर्धवट जळालेला निळ्या रंगाचा बारीक चौकडा शर्ट असून काळ्या रंगाची पॅंट असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनाचा नेमका हेतू लूटमार नसल्याचेही पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलिस अधीक्षक रवींद्र डोंगरे करीत आहेत.

गायब व्यक्तींची द्यावी माहिती
अंगावर आढळून आलेल्या जखमांवरून खून झाला असल्याचे स्पष्ट आहे. खून किती दिवसांपूर्वी झाला आहे हे डॉक्‍टरांच्या अहवालावरूनच कळेल. गेल्या चार-पाच दिवसांपासून गायब असलेल्या व्यक्तींची माहिती असल्यास करमाळा उपविभागीय पोलिस कार्यालयाशी संपर्क करावा.
- डॉ. विशाल हिरे, उपविभागीय पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT