solapur.jpg
solapur.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आयुक्तांसमोरच प्लॅस्टीक पिशव्यांचा "मुक्त' वापर 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महापालिकेच्या अन्न व परवाना विभागाच्यावतीने प्लॅस्टीक जप्तीची मोहिम सातत्याने राबविली जात असली तरी, अजुनही प्लॅस्टीकच्या पिशव्या सर्रास वापरात असल्याचे स्पष्ट झाले. खुद्द महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासमोरच प्लॅस्टीक पिशव्या आणून ठेवल्याचेही दिसून आले. 

शासनाने 23 जूनपासून प्लॅस्टीक बंदी केली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम स्वतः प्लॅस्टीक बंदीच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी सरसावले आहेत. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेनेही मोठ्या प्रमाणात जप्तीची मोहिम राबविली आहे. रोज किमान दोन किंवा तीन व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. दिसले प्लॅस्टीक की कर जप्ती आणि दंडाची कारवाई, असे त्याचे स्वरुप आहे. 

महापालिकेचे पथक एकीकडे धडाकेबाज कारवाई करीत असताना, खुद्द आयुक्तांच्या कार्यालयातच प्लॅस्टीक पिशव्यांचा वावर तोही आयुक्तांसमोरच दिसून आला. शासनाच्या आदेशानुसार डॉ. ढाकणे यांनी प्लॅस्टीकयुक्त पुष्पगुच्छही स्विकारण्यास नकार देण्यास सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या सत्कारासाठी आणलेली शाल प्लॅस्टीक पिशवीत होती, तर गुच्छही प्लॅस्टीकयुक्त होता. त्याचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली. 

प्लॅस्टीक बंदीची प्रमुख जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यासमोरच प्लॅस्टीक पिशव्या आणल्या जात असतील, तर महापालिकेतील संबंधित विभागाला प्लॅस्टीक मुक्तीमध्ये शंभर टक्के यश आले नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

दोन व्यापाऱ्यांना दहा हजारांचा दंड 
प्लॅस्टीक पिशव्या आणि थर्माकोल बाळगण्यावर बंदीच्या तरतुदीखाली शनिवारी शहरातील दोन व्यापाऱ्यांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड करण्यात आला. जीन्स कॉर्नर व राजलक्ष्मी क्‍लॉथ सेंटरच्या चालकांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड करण्यात आला. मात्र महापालिकेतील प्रकारामुळे कारवाईत विरोधाभास असल्याचे दिसून आले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT