Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढ्यातील विकास कामांसाठी सरकारकडून निधी

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : शहरातील जुन्या टाउन हाॅलचे ठिकाणी नविन बहुउद्देशीय सभागृह बांधणेसाठी 6 कोटी रुपये व पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरिता जलशुध्दीकरण केंद्र व उचेठाण जॅकवेल करिता स्वतंत्र एक्सप्रेस फिडर करिता 1 कोटी 10 लाख रुपये निधी तसेच शहराची हद्दवाढ करण्याचे प्रस्तावास लवकरात मंजुरी देण्यात यावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मुंबई येथे देण्यात आले.

यावेळी आ. प्रशांत परिचारक,पक्षनेते अजित जगताप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,विजय बुरकुल,दिपक माने,बबलू सुतार यांनी निवेदन दिले.मुख्याधिकारी पल्लवी पाटील, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,बांधकाम सभापती सब्जपरी मकानदार,विरोधी पक्षनेत्या निर्मला माने,नगरसेवक प्रविण खवतोडे,संकेत खटके,नगरसेविका अनिता नागणे,राजश्री टाकणे,सुमन शिंदे,लक्ष्मी म्हेत्रे,रतन पडवळे,रामचंद्र कोंडूभैंरी,राहुल सावंजी,बशीर बागवान यांच्या सहीने निधी मागणी निवेदन दिले. या कामास लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देणेचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले तसेच सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील व नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांनी सकारात्मकता दर्शविली.

शहरातील कलावंतांच्या कला सादरीकरणाला नाट्यगृह नसल्यामुळे गैरसोय होत असल्याचे वृत्त सकाळ ने प्रसिद्ध केले होते यासाठी नाट्यपरिषद मंगळवेढा शाखा,मराठी साहित्य परिषद  शाखेच्यावतीने  बहुउद्देशीय सभागृह बांधणे कामासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.तर शहरात नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी वीजेचा स्वंतत्र फिडर असणे आवश्यक आहे परंतु स्वतंत्र फिडरचा प्रस्ताव देखील महावितरणची प्रलंबित असल्याचे वृत्त ही सकाळ ने नुकतेच प्रसिद्ध केले होते.

मागणी केलेली कामे लवकरात लवकर मंजूर व्हावी यासाठी पाठपुरावा  करून शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- आ. प्रशांत परिचारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT