palakhi
palakhi 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढ्यात गजानन महाराज पालखीचे आगमन

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : शेगावहून निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आज शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले.

सर्वप्रथम दामाजी महाविदयालय येथे अध्यक्ष राहुल शहा, प्राचार्य एन.बी.पवार, किसन गवळी बासाहेब पाटील, अ‍ॅड रमेश जोशी यांनी स्वागत केले. तर बोराळे नाका येथे नगराध्यक्षा अरुणा माळी, संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे, उपाध्यक्ष आंबादास कुलकर्णी, भारत निकम, प.स. सभापती प्रदीप खांडेकर, समाजकल्याण सभापती शिला शिवशरण पक्षनेते अजित जगताप, सचिन शिवशरण राजश्री टाकणे भागीरथी नागणे सचिन शिंदे  संकेत खटके सोमनाथ माळी आदीसह विविध पक्षाच्या मान्यवर व शहरातील नागरिकानी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले.

या पालखी सोबत 1150 वारकरी असून याशिवाय तीन घोडे, संगीत बॅड असा लवाजमा आहे. या वर्षी भाविकांच्या सोयीकरिता दर्शनबारी उभारण्यात आली आहे. नगरपालिकेने मुक्काम परिसरात औषधफवारणी केली, शहरातील रस्त्याची दुरुस्ती केली वारकर्‍यांच्या सेवेसाठी भोजनाची, न्याहरीची सोय करण्यात आली आहे. पालखी स्वागतासाठी रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या आहेत. पोलिस स्टेशन कडून शहरातील  पोलिस मित्रांची मदत घेत पालखी साठी चोख बंदोबस्त ठेवला.शहरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT