पश्चिम महाराष्ट्र

"गारमेंट फेअर'ला "बूस्टर'

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर - येथील गारमेंट उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन कर्नाटकातील बंगळूर या मेट्रो शहरात होत आहे. तेथे या प्रदर्शनास देश-विदेशांतील खरेदीदार, मोठ्या कंपन्या, उद्योजक भेटी देणार आहेत. या प्रदर्शनासाठी लाखोंचा खर्च येत असून, आर्थिक बाजू सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून प्रोत्साहन दिले असून, यामुळे गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

"गारमेंट असोसिएशन'चे हे तिसरे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आहे. याआधीची दोन प्रदर्शने सोलापुरात सरकारच्या मदतीविना झाली होती.

असोसिएशनने पुढाकार घेऊन सभासद, स्टॉलधारक व कापड मिल यांच्याकडून निधी जमवून प्रदर्शने भरवली होती. गेल्या वर्षी मफतलाल कंपनीने मदतीचा हात दिला होता. राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती; मात्र अहमदाबाद येथील टेक्‍स्टाइल इंडियाच्या प्रदर्शनात सोलापूरच्या गारमेंट उत्पादकांना स्टॉल दिल्याने निधी मिळाला नाही.

तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र आदी राज्यांतील ग्राहक, व्यापारी व शैक्षणिक संस्थांनी प्रदर्शनाला भेट द्यावी या हेतूने यंदा हायटेक प्रचार यंत्रणा राबविली आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांचा प्रवास, निवास, भोजन आदींचा खर्च पाहता, जवळपास 75 लाखांचा खर्च येणार आहे. त्यातच सोलापुरातील उत्पादकांनी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी त्यांना सवलतीत स्टॉल देण्यात आले. गारमेंट व कापड मिल स्टॉलचे भाडे वगळता इतर खर्चासाठी असोसिएशनला पदरमोड करावी लागणार होती.

यंदाच्या प्रदर्शनासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. देशात कुठेच न भरणाऱ्या गणवेश प्रदर्शनाचे आयोजन तसेच सोलापुरातील गारमेंट उत्पादकांच्या जिद्दीचे प्रशस्तिपत्र म्हणून यंदा सरकारने 20 लाख मंजूर केले, तो निधी असोसिएशनला मिळाला आहे.

तिसऱ्या वर्षी आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन भरवीत आहोत. सोलापूरला गारमेंट हब बनविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र प्रदर्शनासाठी येणारा खर्च झेपत नाही. या वर्षी सरकारने 20 लाख निधी देऊन बळकटी आणली आहे.
- प्रकाश पवार, संचालक, श्री सोलापूर रेडिमेड गारमेंट असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT