sawant
sawant 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरच्या शिवसैनिकांना अच्छे दिन! 

परशुराम कोकणे

सोलापूर : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने सोलापुरातील शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे. मंत्रिपदामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही सोलापुरात शिवसेनेला फायदा होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील जलसंधारण योजनांच्या कामांसह विविध शासकीय कार्यालयात प्रलंबित असलेली कामे मार्गी लागण्याची आशा शिवसैनिकांत निर्माण झाली आहे. 

केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये सहभागी असूनही अनेक शासकीय कार्यालयात शिवसैनिकांची कामे मागे पडतात. भारतीय जनता पार्टीप्रमाणे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपेक्षित मान मिळत नसल्याची खंत अनेकांच्या मनात आहे. मात्र, आता सोलापूरला मिळालेल्या मंत्रिपदामुळे शिवसैनिकांना अच्छे दिन येणार असल्याची चर्चा आहे. सावंत यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात किमान पाच आमदार निवडून येतील, असे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात सध्या नारायण पाटील हे एकच आमदार आहेत. आता जिल्ह्यात शिवसेनेला मिळणाऱ्या जागांवरील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सावंत यांच्यावर असणार आहे. सावंत यांनी अनेक ठिकाणी बाळासाहेब ठाकरे जलक्रांती योजना राबविली आहे. त्यांना जलसंधारणाच्या कामाचा अनुभव असल्याने सोलापुरातील दुष्काळावर मार्ग काढण्यासाठी मंत्रिपदाचा फायदा होणार आहे. 

दरम्यान, सावंत यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने जुन्या शिवसेना पदाधिकाऱ्यांत नाराजी आहे. सावंत यांना मंत्री म्हणून दोन-तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. एवढ्या कमी कालावधीत सावंत यांना विशेष असे काहीच करता येणार नाही. निवडणुकीनंतर पुन्हा सरकार आल्यास सावंत यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळेल की नाही हेही सांगता येत नाही, असे काही शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT