pruthvi.jpg
pruthvi.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सरकारचे अपयश त्यांना खाली खेचेल : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : राज्यात परिवर्तन होणार हे निश्‍चित आहे. भाजप सरकारचे अपयशच त्यासाठी कारणीभूत ठरेल असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. 

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिका शाळा क्रमांक तीनमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी सौ. सत्त्वशीला चव्हाण उपस्थित होत्या.

मतदानाला जाण्यापूर्वीच प्रवेशद्वारावर लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांची व आमदार चव्हाण यांची भेट झाली दोघांनीही हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. सत्त्वशीला चव्हाण व सौ. रजनीताई पाटील याही उपस्थित होत्या.

आमदार चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले राज्यात परिवर्तन होणार हे निश्‍चित आहे. सरकारचे अपयशच त्यासाठी कारणीभूत ठरेल. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न बाजूला ठेवून 370 कलम हा प्रचाराचा मुद्दा विरोधकांनी केला आहे. पायाभूत सुविधा, आर्थिक मंदी आधी प्रश्न आ वासून उभी असताना त्याकडे सरकारने केलेले दुर्लक्ष केले हेच राज्यातील परिवर्तनाचे कारण ठरेल. कऱ्हाड दक्षिणेतील जनतेने कोणाला पाडायचे आहे हे ठरवले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कॉंग्रेसच्या विजयाची परंपरा यापुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, श्रीनिवास पाटील यांनी जास्ती जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT