पश्चिम महाराष्ट्र

सुरेखा पवार यांना गुरू-शिष्य पुरस्कार

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - रेखासम्राट टी. के. वडणगेकर, पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जाणारे गुरू-शिष्य पुरस्कार आज जाहीर झाले. ‘सकाळ’च्या ‘स्मार्ट सोबती’ पुरवणीच्या संपादक सुरेखा पवार, चित्रकार बबन माने यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कारांचे वितरण होईल.  सुरेखा पवार गेली पंचवीस वर्षे पत्रकारितेत असून कोल्हापूर, सांगली आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमांसाठीही त्यांनी लेखन व सादरीकरण केले आहे. 

‘सकाळ’मध्ये सुरवातीला त्यांनी ‘लक्षवेधी’ पुरवणी सुरू केली. त्यानंतर ‘स्मार्ट सोबती’ या साप्ताहिक पुरवणीच्या संपादक म्हणून त्या गेली पंधरा वर्षे कार्यरत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील वाचकांचा या पुरवणीला आजवर उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ‘सई’ या टोपणनावाने पाच वर्षे त्यांचे सुरू असलेले ‘हाय फ्रेंडस्‌’ हे सदरही वाचकप्रिय आहे.   

शिवाजी विद्यापीठाच्या ललित कला विभागात बबन माने कार्यरत असून जी. डी. आर्ट (कमर्शियल) पूर्ण केल्यानंतर ॲनिमेशन क्षेत्रात त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर ते कलाशिक्षक म्हणून रुजू झाले. विविध माध्यमातील वास्तवदर्शी कलाकृती ही त्यांची खासियत आहे. देशभरात अनेक ठिकाणी त्यांची चित्र प्रात्यक्षिके आणि प्रदर्शने झाली आहेत. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार के. आर. कुंभार, विलास बकरे, विजय टिपुगडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT