Hasan Mushriff
Hasan Mushriff 
पश्चिम महाराष्ट्र

हसन मुश्रीफ म्हणाले ; जिल्ह्याचा पालकमंत्री कोण हे अजून फायनल नाही...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - गडहिंग्लज पालिकेने स्वनिधीतून व्यायामशाळा उभारून एक आगळेवेगळे उदाहरण घालून दिले आहे. त्याच पद्धतीने महिलांसाठीही व्यायामशाळा उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून निधी देता येईल; पण जिल्ह्याचा पालकमंत्री कोण हे अजून फायनल नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

व्यायामशाळेचे उद्‌घाटन

येथील नगरपालिकेने नूतनीकरण केलेल्या व्यायामशाळेचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी श्री. मुश्रीफ बोलत होते. माजी आमदार श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रा. के. बी. केसरकर, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांची उपस्थिती होती. गांधीनगरातील पॅव्हेलियन हॉलमध्ये कार्यक्रम झाला.मंत्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘देशात तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांच्या जोरावरच देश महासत्ता होईल. तरुणांना व्यायामाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे चांगले काम पालिकेने केले आहे. पालिकेला जास्तीत जास्त निधी देण्याची जबाबदारी माझी आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडेन.’’ ॲड. शिंदे म्हणाले, ‘‘गडहिंग्लजला खेळाची चांगली परंपरा आहे.’’

बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर यांनी स्वागत केले. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक महेश कोरी यांनी गडहिंग्लज नगरीच्या तरुणांचे स्वास्थ चांगले राखण्यासाठी व्यायामशाळेची उभारणी केल्याचे सांगितले.  प्रा. केसरकर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमात नगरसेवक प्रकाश मोरे, शकुंतला हातरोटे, नरेंद्र भद्रापूर, शशिकला पाटील, श्रद्धा शिंत्रे, महेश कोरी, शुभदा पाटील यांचा सत्कार झाला.  गटनेते बसवराज खणगावे, नगरसेवक हरुण सय्यद, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने आदी उपस्थित होते. राजेंद्र भुईंबर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी आभार मानले.

महिलांसाठीही व्यायामशाळा...

नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, ‘पालिकेने स्वनिधीतून व्यायामशाळेचे नूतनीकरण केले आहे. लवकरच महिलांसाठीही स्वतंत्र व्यायामशाळा उभारली जाईल. तसेच नगराध्यक्ष चषक फुटबॉल, क्रिकेट स्पर्धांच्या धर्तीवर शरीरसौष्ठव स्पर्धाही घेतली जाईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT