Hearse Repaired
Hearse Repaired Sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : शववाहिकेची दुरुस्ती; ताफ्यातही दाखल

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - दयनीय अवस्थेत असलेल्या शववाहिकेची अखेर महापालिकेने दुरुस्ती केली आहे. शववाहिकेच्या दुरवस्थेचे वृत्त ‘सकाळ’ने १३ मे रोजी ‘स्ट्रेचरची दुर्दशा, कुशनही खराब’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिकेने तातडीने या शववाहिकेची दुरुस्ती करुन घेतली. सोमवारी (ता. १६) दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर शववाहिका आता महापालिकेच्या ताफ्यात पुन्हा दाखल झाली आहे. त्यामुळे शववाहिकेची समस्या तात्पुरती सुटली आहे.

दरम्यान, अन्य शववाहिकांमध्ये काही समस्या असतील, तर त्याची माहिती घेऊन त्या समस्याही सोडविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एकीकडे बेळगाव शहर स्मार्ट झाल्याचा दावा केला जात असताना महापालिकेच्या शववाहिकेच्या दुरवस्थेवरुन गेल्या आठवड्यात महापालिकेला लक्ष्य करण्यात आले होते. शववाहिकेचा एक व्हिडीओ तयार करुन तो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेची चांगलीच बेअब्रू झाली होती. शववाहिकेची तातडीने दुरुस्ती केली जावी, अशी मागणीही वाढली होती. महापालिकेनेही वेळ न दवडता शववाहिकेच्या दुरुस्तीचे काम सुरु केले होते. केवळ चार दिवसांत शववाहिकेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले असून आता महापालिकेने दाखविलेल्या तत्परतेचेही कौतुक होत आहे.

बेळगाव शहराची लोकसंख्या पाच लाख आहे, पण महापालिकेकडे केवळ चार शववाहिका आहेत. त्यातील एका शववाहिकेची दुरवस्था झाली होती, पण तीच शववाहिका महापालिकेकडून पाठविली जात होती. त्यातून मृतदेह नेला जात होता. त्यातून मृताचे नातेवाईक स्मशानभूमीपर्यंत जात होते. शववाहिकेच्या आतील स्ट्रेचरची खूपच दुरवस्था झाली होती. त्यावरील सर्व कुशन निघून गेले होते. त्यावरच मृतदेह ठेवला जात होता. नातेवाईकांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांचीही दुरवस्था झाली होती. शववाहिकेच्या आतील भागाची संपूर्ण दुरवस्था झाली होती. त्यातून मृतदेह न्यायचा कसा? असा प्रश्‍न नातेवाईकांना पडावा, अशीच स्थिती होती. मात्र, त्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस कोण दाखवित नव्हते. महापालिकेच्या वाहन विभागाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले होते, पण शववाहिकेच्या दुरवस्थेचा व्हिडीओ व्हायरल झाला. ‘सकाळ’ने त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेला त्याची दखल घ्यावीच लागली.

एक शववाहिका ‘आरोग्य’कडेच

महापालिकेकडे चार शववाहिका असल्या तरी त्यातील एक शववाहिका कोरोना काळात कोरोना मृतांसाठी देण्यात आली आहे. ती शववाहिका अजूनही आरोग्य विभागाकडेच आहे. कोरोना कमी झाल्याने शववाहिका महापालिकेकडे देणे आवश्‍यक होते. त्यामुळे सध्या तीनच शववाहिका पालिकेकडे आहेत. त्यातील एका शववाहिकेची दुरवस्था झाल्यामुळे सुस्थितीतील दोनच शववाहिका आहेत. आता दुरुस्तीमुळे पुन्हा त्यांची संख्या तीन झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT