Prajakta Gaikawad 
पश्चिम महाराष्ट्र

छत्रपती संभाजी राजांचा इतिहास ‘यांच्या’मुळे जगाला समजला : प्राजक्ता गायकवाड

हुकुम मुलाणी
मंगळवेढा (सोलापूर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगात सर्वांनाच माहीत आहे. परंतु, दुर्लक्षित कर्तृत्ववान छत्रपती संभाजी राजांचा इतिहास जगाला खासदार अमोल कोल्हे यांच्यामुळे माहीत झाल्याचे प्रतिपादन येसूबाईच्या भूमिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केले. माझ्याकडे आलेली भूमिका ताकदीने साकरली दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र व कला महाविद्यालय इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक तंत्रयुक्त व व्यवसायिक विभाग व शिवतेज प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलन व विविध कलागुणदर्शन कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणावेळी त्या बोलत होत्या. अभिनेत्री गायकवाड म्हणाल्या, येसूबाईची भूमिका स्वीकारताना माझ्यासमोर मोठे आव्हान होते. त्यासाठी ढाल, तलवार, घोडेस्वारीसह इतर धाडसी कृत्य येणे आवश्‍यक होते. परंतु, ध्येय ठरवून वाटचाल केल्याने 15 दिवसांत जी भूमिका माझ्याकडे आली ती मी ताकदीने साकारली आणि माझी भूमिका प्रेक्षकानांही पसंत पडल्याने त्याला भरभरून दाद मिळाली. या वेळी अध्यक्षा डॉ. मीनाक्षी कदम व प्राचार्य सुभाष कदम यांचे भाषण झाले. स्नेहसंमेलनातून नाटकाची परंपरा प्रास्ताविकात प्राचार्या तेजस्विनी कदम यांनी स्व. कदम गुरुजींनी 15 विद्यार्थ्यांवर सुरू केलेल्या शाळेने अनेक देश, राज्य पातळीवरील विद्यार्थी घडवले. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून नाटकाची परंपरा जोपासली. या वेळी अध्यक्ष ऍड. सुजीत कदम, उपाध्यक्ष बी. टी. पाटील, सचिव प्रियदर्शिनी कदम-महाडिक, प्राचार्य डॉ. सुभाष कदम, उपप्राचार्या तेजस्विनी कदम, जकाराया शुगरचे बी. बी. जाधव, पत्रकार दिगंबर भगरे, यतिराज वाकळे, जयराम आलदर, किसन डांगे, कल्याण भोसले आदी उपस्थित होते. बालाजी शिंदे आणि व्यंकटेश साठे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शिवाजी बंडगर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT