crime
crime 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर: खुरप्याचे वार करुन पत्नीचा निर्घृण खून

सकाळवृत्तसेवा

मुरगुड : कोल्हापूर जिल्ह्यातील भडगाव (ता. कागल) येथे पती पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पतीने काठीने व खुरप्याचे वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. दिपाली रामचंद्र पोवार (वय 40) असे या दूर्देवी महिलेचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. पती रामचंद्र पोवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांतून मिळालेली माहीती अशी,भडगाव ( ता.कागल ) येथील रामचंद्र दत्तात्रय पोवार याने आपली पत्नी दिपाली रामचंद्र पोवार (वय 40 ) हिला आज पहाटे किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून बाबुराव गंगाराम खतकर रा. भडगाव यांच्या सोयाबीन शेतामध्ये नेऊन खुरपे व मेसकाठीने हातावर, पाठीवर, नितंब आणि गुढघ्यावर वार करून तिचा निर्घृण खून केला. पोवार कुटुंबिय हातावरचे पोट असणारे सामान्य कुटुंब आहे. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे.त्यापैकी कुमारी माधुरी ही आपल्या आत्याकडे राहते.ती दहावीत शिकते. तर कुमारी सविता व कुमार महादेव हे दोघे नववी व सातवीत एका आश्रम शाळेत शिकत आहेत. रामचंद्र पोवार यास दारूचे व्यसन असल्याचे समजते त्यातूनच त्याने आपल्या पत्नीचा खून केला असावा. असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

भडगावचे पोलिस पाटील उत्तम बाळासो भारमल यांनी घटनेची वर्दी मुरगुड पोलीस ठाण्यात दिली असून घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. पती रामचंद्र पोवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विठ्ठल दराडे करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT